जामखेड येथे मटका व मावा केंद्रावर धाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

जामखेड येथे मटका व मावा केंद्रावर धाड

 जामखेड येथे मटका व मावा केंद्रावर धाड

अहमदनगर गुन्हा शाखेची कारवाई


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः एलसीबीच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी जामखेड शहरातील तपनेश्वर गल्ली येथे मटका अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत 01 हजार 380 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस काँस्टेबल प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून रज्जाक बशीर पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान एलसीबीच्या पथकाने बाजारतळावरील भुतवडा रोड या ठिकाणी सागर पान सेंटरवर मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या धाडीत 12 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यामध्ये सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान पोलिस काँस्टेबल रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून सचिन सोपान डिसले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड काँस्टेबल शिवाजी भोस व पोलिस नाईक कोळपे हे करत आहेत.
या कारवाईच्या पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हेड काँस्टेबल भाऊसाहेब कुरूंद,पो. कॉ रणजीत जाधव, संभाजी कोतकर,प्रकाश वाघ, जामखेड पोलिस स्टेशनचे हेड काँस्टेबल शिवाजी भोस, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here