पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून राम मंदिरासाठी भरीव निधीचे संकलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून राम मंदिरासाठी भरीव निधीचे संकलन

 पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून राम मंदिरासाठी भरीव निधीचे संकलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आर्थिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्‍या पंडित दीनदयाळ पत्संस्थाच्या वतीने अयोध्येतील प्रभुरामाच्या मंदिर निर्माण कार्यात हातभार लावण्यासाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार विविध क्षेत्रातिल नागरिक व पंदिन दीनदयाळ पतसंस्थेच्या सभासदांनी आवाहनास प्रतिसाद देत निधी समर्पण केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेत झालेल्या बैठकीत पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा व सचिव विकास पाथरकर यांनी राम मंदिरासाठी निधी संकालाचे जिल्हा प्रमुख श्रीकांत जोशी, जनकल्याण समितीचे प्रमुख डॉ. रवींद्र साताळकर यांच्या कडे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयेटे यांच्या उपस्थितीत जमा झालेले सर्व धनादेश सुपूर्द केले. तसेच 1992 साली अयोध्येत जावून कारसेवा करणार्‍यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, ज्या दिवशी प्रभुरामाच्या मंदिर उभारणीचा निकाल न्यायालयाने दिला त्यावेळे पासून मंदिर उभारणीसाठी तनमनधनाने भरीव योगदान देण्याचा निर्णय दीनदयाळ पतसंस्था परिवाराने घेतला होता. आता रामाच्या मंदिराचे प्रत्यक्ष काम सुरु झाले आहे. ही सर्वोच्च आनंदाची घटना आहे. या कार्यात सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. काका कोयेटे म्हणाले, पंडित दीनदयाळ पतसंस्था व वसंत लोढा हे कायम सामाजिक कार्याला प्रध्यान देत असतात. रामाच्या मंदिर निर्माणसाठी संपूर्ण भारातातून नागरिक योगदान देत आहे. हे राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे व रामाचे दर्शन आपल्या सर्वाना लवकर होवो, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्रीकांत जोशी यांनी पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून भरीव निधी संकलन झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. अनिल सबलोक यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी लक्ष्मिनारायण पतसंस्थेचे चेअरमन नरेंद्र बागडे, जेष्ठनेते सुनील रामदासी, प्रा.मधुसूदन मुळे, माजी उपमहापौर दीपक सूळ, शाकीर सय्यद, काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, नरेश गुगळे, प्रकाश धाडगे, कैलास दळवी, विश्वहिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, अनिल रामदासी, पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here