राहुरीतील पवनऊर्जा प्रकल्प 10 वर्षांपासून बंद ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

राहुरीतील पवनऊर्जा प्रकल्प 10 वर्षांपासून बंद !

 राहुरीतील पवनऊर्जा प्रकल्प 10 वर्षांपासून बंद !


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
राहुरी ः राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांसाठी महत्वाकांक्षी सौर ऊर्जेचा प्रकल्पभूमीपूजन मोठ्या थाटात संपन्न केला .मात्र असे असताना राहुरी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा पवनऊर्जा प्रकल्प गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे , पदाधिकारीच राज्यात सत्तेवर असल्याने पालिका प्रशासन ऊर्जाबचतीसाठी काही योजना आणेल का ? असा प्रश्न शहरवासियांमधून विचारला जात आहे .
विविध शासकीय संस्था वीजबचतीसाठी सौरऊर्जा , पवनऊर्जेचा वापर करण्याबाबत प्रचार करत असतात . परंतु त्याचा हवा तसा प्रसार होत नाही .10 वर्षांपूर्वी 2011 साली राहुरी नगरपालिकेची इमारत नगर जिल्ह्यातील जेष्ठ नेते , माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधून झाली . त्यांच्याच संकल्पनेतून पालिकेची विजेची गरज भागवण्यासाठी पवनऊर्जा प्रकल्प अमलात आणला गेला . नगर जिल्ह्यातील हा एक आदर्श प्रकल्प म्हणून तो ओळखला गेला . 30 लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पालिका प्रशासनाला महिन्याला 300 ते 350 युनिट वीजनिर्मिती होत होती . यामुळे 25 ते 30 हजार रुपयांची बचत होत होती . दोन वर्षात पालिकेची 35 ते 40 लाख रुपयांची बचत झाली होती . 2013 पासून या प्रकल्पाच्या इमारतीच्या टेरेसवरील पवनऊर्जा पवनचकीचे पाते आजपर्यंत फिरलेच नाही . हा प्रकल्प धूळखात पडून आहे .
राज्यातील आशा प्रकल्पाबाबत सरकारने एका अधिसूचनेद्वारे सर्व संस्थांना कार्यालयीन इमारतीमध्ये विजेची गरज भागवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी व्यवस्था करावी , असे त्यावेळी निर्देश दिले होते . सरकारच्या पुणे विभाग पेथील महाराष्ट्र ऊर्जा विकास नैसर्गिकरित्या अभिकरण ( मेडा ) या महाऊर्जा वीज कार्यालयात सौरऊर्जेवरील प्रकल्पाबाबत आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले होते . परंतु त्याचे पुढे काय झाले ते अनुत्तरीत आहे .
राहुरी नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालयीन विभाग आहेत . या सर्व ठिकाणी नैसर्गिकरित्या उत्पादित केलेली वीज तीन वर्ष वापरली गेली होती . पथदर्शी म्हणून राबविलेला प्रकल्प कमालीचा यशस्वी झाला होतो होता . एका दिवसाला सरासरी जात 12 युनिटची बचत त्यावेळी झाली . नगरपालिका कार्यालयावर उपकरणात बसवलेल्या यंत्रणेद्वारे सुमारे 10 किलो वॅट वीज निर्माण होऊन कार्यालयासह सर्व खात्यांना वीज पुरविली जात होती . याचा या ट्युबलाईट , पंखा , संगणक या उपकरणांना उपयोग झाला . आरोग्य , रोषणाई , जन्म मृत्यू वसुली विभाग , एक खिडकी योजना , प्रशासन , बांधकाम विभाग , भांडार विभाग , नगराध्यक्ष उपाध्यक्ष , मुख्याधिकारी कार्यालय , इमारतीतील मोकळा परिसर या ठिकाणी वीजपुरवठा होत होता . जिल्ह्यातील ही एकमेव नगरपालिका हा प्रकल्प राबवणारी ठरली होती . या प्रकल्पातील बॅटन्यांमध्ये वीज साठविली जाता होतो . त्यातून सर्वत्र पुरवठा केला जात होता . तीन मजली इमारतीला लागेल तितकी वीज दिली होती उपकरणात बिघाड झाला तरच महावितरणकडील वीज वापरात येत होती . इतरवेळी मात्र बचत व्हायची . परंतु 10 वर्षांपासून या यंत्रणेच्या पवनचकीचे पातेच न फिरल्याने वीजनिर्मिती होऊ शकलेली नाही .
राहुरी पालिका प्रशासकीय इमारतीला वीजबिलपोटी दरमहा 25 -28 हजार रुपये खर्च येतो . सध्या शहरातील पथदिव्यांचे जुने सीएफएल बल्ब बदलून केंद्र सरकारच्या संकल्पनेतील एलईडी बल्ब बसवले जात आहेत . यामुळे 50 टक्के वीजबचत होणार आहे . शहरात एक हजार बल्ब लावले जात आहेत . नगरपालिकेने महाऊर्जाच्या सहाय्याने सौरऊर्जे वरील चालणारी व्यवस्था केली तर उर्जाबचत होऊ शकते . त्यासाठी सत्ताधार्‍यांनाच पुढाकार घ्यावा लागेल , त्यासाठी जेष्ठ नेते मा खा प्रसाद तनपुरे यांनीच लक्ष द्यावे, असा सूर शहरात उमटत आहे.

No comments:

Post a Comment