बदलत्या काळानुसार व्यवसायामध्ये बदल केला तरच प्रगती ः पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

बदलत्या काळानुसार व्यवसायामध्ये बदल केला तरच प्रगती ः पवार

 बदलत्या काळानुसार व्यवसायामध्ये बदल केला तरच प्रगती ः पवार

साईश्रद्धा टेलरिंगचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काही वर्षापूर्वी मोबाईलच्या जमान्यात नोकियाने नाव कमावले. हातावरील घड्याळ एचएमटी शिवाय दिसतच नव्हती आता इंटरनेट युगात ज्यांनी व्यवसायात बदल केला त्यांचे नाव झाले. बदलत्या काळानुसार व्यवसायामध्ये बदल केला तरच प्रगती शक्य असते हे काळ शिकवतो, असे प्रतिपादन नगरसेविका संध्याताई पवार यांनी केले.नित्य सेवा सोसायटीत साई-श्रद्धा टेलरिंग फर्मचा शुभारंभ सौ.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगरसेविका दिपालीताई बारस्कर, सिमा त्र्यंबके, ज्योती शिंदे, संगीता वारेे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे, योगिराज धामणे, राहुल पाटोळे, रमेश बिडवे, बबन इंगवले आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संचालिका रेश्मा पवने यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्तविकात या टेलरिंग फर्मच्या माध्यमातून दर्जेदार व चांगल्या सेवा मिळेल. त्याचप्रमाणे परिसरातील युवती, महिलांसाठी मोफत टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले.नगरसेवक सुनिल त्र्यंबके, योगेश पिंपळे यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करू.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here