स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुनिल भंडारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुनिल भंडारी

 स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुनिल भंडारी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महान गायक मोहम्मद रफी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन गीत गायनाच्या कार्यक्रमात एकचवेळी 96 गायकांनी गाणे म्हणून स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले. या गायकांमध्ये अहमदनगरमधून गाता रहे मेरा दिल ग्रुपचे सुनिल भंडारी सहभागी झाले होते.इंदोर येथील केकेसी क्लब व संगीत सेवा सहारा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच फेसबुक व झूम अ‍ॅपद्वारे ऑनलाईन महाकुंभ गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 96 कलाकारांनी एकचवेळी अविरत मोहम्मद रफी यांची गिते गायली. यामध्ये सुनिल भंडारी सहभागी झाले; या कार्यक्रमाचा स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. यापुर्वीही सुनिल भंडारी यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून गाण्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमातील सहभागाबद्दल त्यांचे अहमदनगर मधील गाता रहे मेरा दिल ग्रुप व अनेक संगीतप्रेमींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment