वाढत्या गॅस दरवाढीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शेणाच्या गोवर्‍यावर स्वयंपाक आंदोलन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

वाढत्या गॅस दरवाढीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शेणाच्या गोवर्‍यावर स्वयंपाक आंदोलन!

 वाढत्या गॅस दरवाढीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शेणाच्या गोवर्‍यावर स्वयंपाक आंदोलन!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व सामान्य गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. कोरोना टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल झाले आहेत त्यातच या  दरवाढीमुळे  केंद्र सरकारच्या विरोधात भयंकर असंतोष आहे.
यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. पण केंद्राच्या वतीने त्याची दखल घेतली नसल्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी आहे. त्याचा उद्रेक या आंदोलनाच्या वतीने होत आहे. सर्व सामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली. तेल कंपन्यांनी ङ.झ.ॠ. सिलेंडरचा किमती जाहीर केल्या असून हे दर प्रति सिलेंडर 25 रुपयांनी वाढवण्यात आले.
शासनाचे हे गणित सर्व सामान्यांना अवाक्या बाहेरचे आहेत त्यांना ही दरवाढ जीव नकोसा करणारा आहे त्यामुळे हे पाऊल उचलावे लागत आहे.अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष सौ. रेश्मा आठरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. त्यावेळेस युवती शहर अध्यक्षा अंजली आव्हाड, अपर्णा पालवे, सुनंदा कांबळे, वैशाली गुंड, सुनिता पाचारणे, किरण कटारिया, सायेरा शेख, उषा सोनटक्के, लता गायकवाड, शितल राऊत, प्रिती संचेती , वैशाली भापकर, शोभा तांदळे, अर्चना केदारी, अलीशा गर्जे, शितल गाडे, विमल पाचरणे, आदी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here