राष्ट्र मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाचे योगदान असावे- गजेंद्र सोनवणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

राष्ट्र मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाचे योगदान असावे- गजेंद्र सोनवणे

 राष्ट्र मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाचे योगदान असावे- गजेंद्र सोनवणे

नेप्ती कांदा मार्केट आडते व्यापार्‍यांचा श्रीराम मंदिरासाठी निधी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 500 वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अयोध्येत श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर होत आहे.या मंदिर निर्माणासाठी सरकारी पैसे घेतले जाणार नाहीत.तसेच एका परिवाराच्या योगदानातून हे मंदिर होणार नाही. राम मंदिर निर्माण कार्यात सर्व भारतीयांचे योगदान असावे या संकल्पनेतून रामभक्त घरोघरी जाऊन निधी संकलन करीत आहेत.प्रभू श्रीराम हे राष्ट्रपुरुष होते. श्री राम मंदिर हे राष्ट्र मंदिर होत आहे.राष्ट्र मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाचे योगदान असावे.असे प्रतिपादन अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे यांनी केले.
केडगाव नेप्ती कांदा मार्केट येथील आडते व्यापार्‍यांनी श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र निधी संकलन अभियानात उस्फुर्तपणे सहभागी होऊन श्रीराम मंदिरासाठी भरीव निधी दिला. याप्रसंगी जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे बैठकीत बोलत होते.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मुकुल गंधे,नंदकुमार शिकरे, बबनराव घुले, निलेश चिपाडे, अनुराग आगरकर, विहिप चे प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, हर्षल ठुबे, आनंद चंदे, मिलिंद महाजन, उमेश मुळे,अथर्व पतुरकर, गिरीधर हांडे,करण भळगट, सत्यनारायण पुरोहित, राहुल ढवळे, दीपक आगरकर, हर्षल ठुबे, आदींसह व्यापारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.                                                                                                       शेतकरी वर्ग, हमाल, व्यापारी यांनी भरीव समर्पण श्रद्धा निधी देऊन हातभार लावला. नंदकुमार शिकरे म्हणाले कि, प्रत्येकाच्या मनात श्री राम मंदिर व्हावे अशी भावना आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here