कल्याणरोड चौपदरीकरणाला लवकरच मंजुरी आणणार - आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

कल्याणरोड चौपदरीकरणाला लवकरच मंजुरी आणणार - आ. संग्राम जगताप

 कल्याणरोड चौपदरीकरणाला लवकरच मंजुरी आणणार - आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
नगरशहरातून जाणारा कल्याण विशाखापट्टनम राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलापासून शिवाजीनगर, नेप्तीनाका, अमरधाम आयुर्देव कॉलेज, नवीन टिळक रोड व सक्कर चौकापर्यंतचा चौपदरीकरण रस्त्याच्या कामाला मंजुरी आणणार आहे. देशाचे नेते शरद पवार यांना भेटून या रस्त्याबाबत पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच केंद्रीय सडक परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू असून लवकरच मंजूरी मिळून कामाला सुरूवात होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. कल्याणरोडचे पाहणी व पॅचींगच्या कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी प्राध्यापक अरविंद शिंदे, काका शेळके, युवराज शिंदे, संतोष लांडे, अँड. जंयत जाधव, राम वाघ, वैभव वाघ, निलेश शिंदे, सचिन मुदगल, राजू वामन, सनी शिंदे, सनी आगरकर, हरीभाऊ यलदंडी, राजू दातरंगे, डॉ. हराळ आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कल्याण रोड परिसरामध्ये मोठी लोकवस्ती वाढत आहे. या रस्त्यावरून मोठी वाहतूक होत असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्यांमुळे छोटे, मोठे अपघात दररोज घडत आहेत. काहीजण तर मृत्युमुखी पडले आहे. यासाठी या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. हा रस्ता चौपदरीकरणाचा आहे. फुटपाथ तसेच सीनानदीवरील पुलाचे कामही होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असे ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here