गोपीनाथ मुंढेनंतर विजय वड्डेटीवारच नेता- सानप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

गोपीनाथ मुंढेनंतर विजय वड्डेटीवारच नेता- सानप

 गोपीनाथ मुंढेनंतर विजय वड्डेटीवारच नेता- सानप

ओबीसी, व्हीजे, एनटी पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सर्वसामान्य जनतेचे दैवत म्हणून ज्यांना उभा महाराष्ट्र ओळखतो, असे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे हे माझेही नेतेच होते. त्यांच्यानंतर मी ओबीसी, व्हीजे एनटीसाठी मंत्रीपदपणाला लावण्याची हिंमत दाखवणारे ना. विजय वड्डेटीवार हे आता माझे नेते आहेत. आमचा हा नवा ऋणानुबंध उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी असणार आहे, असा विश्वास ओबीसी, व्हीजे, एनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केला.

जनमोर्चाच्या नगर शहर जिल्हा शाखेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना सानप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा उपक्रम छोटेखानी समारंभात करण्यात आला. यावेळी श्री.सानप बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.
पुढे बोलतांना श्री.सानप म्हणाले, राज्यात ओबीसी, व्हीजे, एनटी बांधवांचे संघटन मजबूत असून, जालन्यात लाखांचा मोर्चा, सांगलीतही तीच स्थिती झाली असती. उपेक्षित समाजाला आता आपल्या हक्काची जाणिव झाली आहे. अहमदनगर शहरातही संघटनेचे संघटन बाळासाहेब भुजबळ यांनी मजबूत केले याची नोंद राज्यात झाली असल्याचे श्री.सानप यांनी सांगितले.
 संघटनेच्या नगर शहर जिल्हा शाखेची 101 जणांची कार्यकारिणी नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभुमीवर पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्र देण्यासाठी नगर शहरात आंतरपथ्यांचे नियम व मास्कचा वापर करत 101 पैकी 31 पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उर्वरित पदाधिकारी, सदस्यांना नियुक्तीपत्र देण्याचा सोहळा कोरोना परिस्थिती पाहून घेऊ असे श्री.भुजबळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष सर्वश्री रमेश सानप, प्रकाश सैंदर, अशोक दहिफळे, सरचिटणीस सर्वश्री संजय आव्हाड, श्रीकांत मांढरे, डॉ.श्रीकांत चेमटे, रमेश बिडवे, संजय सागावकर, फिरोज शफी खान, सहचिटणीस सर्वश्री सुनिल भिंगारे, कैलास गर्जे, नईम शेख, कार्य.सदस्य सर्वश्री अनिल निकम, संतोष गेनप्पा, जालिंदर बोरुडे, राजेंद्र पडोळे, सरफराज जाहगिरदार, विशेष निमंत्रित सर्वश्री आनंद लहामगे, डॉ.सुदर्श गोरे, राजेश सटाणकर, निशांत दातीर, महिला प्रतिनिधी किरण आळकुटे, मंगल भुजबळ, मार्गारेट जाधव आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment