धीवर यांना शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

धीवर यांना शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान

 धीवर यांना शिवछत्रपती समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संगमनेर येथील संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने देण्यात येणार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार 2021’ नुकताच नगर तालुक्यातील कौडगांवचे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब धिवर आ.सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ना. बाळासोहब थोरात म्हणाले, संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, यासाठी शासन काम करत आहे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनीही शासनाच्या योजना संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. आज पुरस्कार प्राप्त खर्या अर्थाने सर्वसामान्यांची सेवा करत आहेत. त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे, असे सांगितले.
याप्रसंगी आ.सुधीर तांबे यांनी संजीवनी संस्थेच्यावतीने तळागाळातील लोकांसाठी काम करणार्यांचा गौरव करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या पुरस्कारामुळे ते करत असलेल्या कार्यास बळ मिळणार आहे. बाबासाहेब धीवर यांचे ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरु असलेले काम कौतुकास्पद आहे. पुरस्कार देऊन त्यांचा उचित सन्मान संस्थेने केला असल्याचे सांगितले.
यावेळी बाबासाहेब धीवर यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे आपण सर्वसामान्यांसाठी काम करत आहोत. या कार्यात योगदान देणार्या सर्वांचा पुरस्कार रुपाने गौरव झाला असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.बाबासाहेब धीरव यांना मिळालेल्या राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती समाजरत्न जीवन गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, विधानसभेचे अध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, आ.डॉ.सुधीर तांबे, पद्मश्री राहिबाई पोपरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार श्री.निकम, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप, सचिव गोरख भवर, प्रा.अनिल धिवर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment