श्रीगोंदा शहरातील एका मोठ्या दवाखान्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

श्रीगोंदा शहरातील एका मोठ्या दवाखान्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू?

 श्रीगोंदा शहरातील एका मोठ्या दवाखान्यात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू?

आर्थिक लाभापोटी अ‍ॅडमिट केले जातात कोविड पेशंट

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहरातील एका मोठ्या रुग्णालयाला कोविड सेंटरची अधिकृत परवानगी नसताना आर्थिक लाभापोटी कोरोनाचे पेशंट अडमिट केले जात असल्याची चर्चा श्रीगोंदा शहरात होत असून या डॉक्टरांनी दवाखान्यात इतर आजाराने अडमिट झालेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केला की काय? या रुग्णालयावर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कोणती कारवाई करणार अशी चर्चा देखील शहरात सूरू आहे.
              श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून याचा फायदा घेत शहरातील एका नामांकित मोठ्या रुग्णालयाने कोविड सेंटरची अधिकृत परवानगी नसताना केवळ आर्थिक लाभापोटी कोरोनाचे पेशंट अडमिट करण्यास सुरुवात केल्याचे चर्चा श्रीगोंदा शहरात होत असून या डॉक्टरांनी दवाखान्यात इतर आजाराने अडमिट झालेल्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे की काय ? या बाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ संघर्ष रा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शहरात फक्त 2 रुग्णालयाना कोविड पेशंट अडमिट करण्याची परवानगी असून अनधिकृत कोविड पेशंट कोण अडमिट करत असेल तर त्यांचेवर कारवाई करण्यात येईल असे सांगीतले.

No comments:

Post a Comment