गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याबाबतचे आ.संग्राम जगताप यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याबाबतचे आ.संग्राम जगताप यांना निवेदन

 गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ता डांबरीकरण करण्याबाबतचे आ.संग्राम जगताप यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गणेशनगर हा परिसर अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे.गणेशनगर जवळच संजय सोसायटी,विणकर सोसायटी,शांतीनगर व रायगड हाइट्स इत्यादी ठिकाणे आहेत.सुमारे पाचशे कुटुंब वास्तव्य करून राहत असून अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहेत.गणेश नगर येथील रस्ते पावसामुळे खराब झाले आहेत. सर्वांना जाण्यासाठी गणेशनगर मधील मुख्य रस्ता हाच एकमेव रस्ता आहे.येथील रहिवाशांना व शाळेत येणार्‍या जाणार्‍या मुलांना सतत या रस्त्याचा वापर करावा लागतो.खराब रस्त्यांमुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून चालावे लागते. आ.संग्राम जगताप यांनी स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून द्यावेत अशी मागणी गणेशनगर परिसरातील रहिवाशांची आहे.                                                    कल्याणरोड येथील  गणेशनगरचा मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करून मिळणे बाबत आ.संग्राम जगताप यांना गणेशनगर परिसरातील स्थानिक नागरिकांकडून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गणेशनगर सोसायटीचे चेअरमन गणेश शिंदे,अनिल राऊत,अतुल वामन,सदाभाऊ शिंदे,सागर शिंदे,मनोज कुंजीर,सुबोध कुलकर्णी,राजेंद्र ताकपेरे,राजू वाळके,महेश शिरसुल,महेश रसाळ,आण्णा   जंगम,अशोक तावरे,गणेश मंचिकटला,नाना देवतरसे, उमेश गोरे,विकी सुपेकर,धर्मनाथ घोरपडे, विशाल माने,वाघस्कर,पोपट शेळके,महादेव जगताप ,संभाजी गरड,नितीन गाली,राजकुमार शिंदे,राजू तेल्ला,संतोष लयचेट्टी,प्रकाश गागरे,पिसाळ,ढोले आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment