रासपची जिल्हा आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

रासपची जिल्हा आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न

 रासपची जिल्हा आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः राष्ट्रीय समाज पक्ष अहमदनगर जिल्हा वतीने पक्षाच्या नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार तसेच आढावा बैठक पक्ष संस्थापक महादेवजी जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली,पक्षाचे मुख्य महासचिव माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले तसेच वरीष्ठ पदाधिकारयां च्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीनारायण कार्यालय स्वास्तीक चौक,अहमदनगर या ठिकाणी पार पडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यात पहिल्या टप्प्यातील घेण्यात आलेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत जिल्ह्यात रासपचे उमेदवार निवडून आले याबाबत मागील आकडेवारी पेक्षा अधिक संख्या वाढली जात असल्याने,पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकी दरम्यान नुतन सदस्यांना वरीष्ठ पदाधिकारयांनी  मार्गदर्शन करुन अभिनंदन केले.
याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशसचिव नितिन धायगुडे,प्रा.माणीकराव दांगडे,जिल्हाअध्यक्ष शरद बाचकर,युवकआघाडीचे जिल्हाअध्यक्ष नाना जुंधारे,  जिल्हापदाधिकारी सलीम बाबा शेख, शेख,ह.भ.प. वाघमोडे महाराज,संभाजी लोंढें,सुवर्णा जरहाड,मंदाकीनी बडेकर,रेखा नरवडे,तसेच सर्वतालुकाअध्यक्ष,इतर पदाधिकारी कार्यकर्ते चिमाजी खामकर,रभाजी खेमनर,गंगाधर कोळेकर, बाजीराव लेंडाळ, नवनाथ पडवळकर, दत्तात्रय शिंदे, संदिप कांदळकर, सुनील चिंधे, पारखे सर, रमेश होरकटे, भगवान करवर, सोपान तांबडे, कपील लाटे,नाना जगताप, मालोजी तिकोळे, आण्णा सरोदे, आत्माराम कुंडकर, पोपट गुलदगड,याचबरोबर अन्य पक्षाचे इतर कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.    

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here