खर्डा उपसरपंचपदी सौ.सुनीता जावळे यांची निवड करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

खर्डा उपसरपंचपदी सौ.सुनीता जावळे यांची निवड करावी

 खर्डा उपसरपंचपदी सौ.सुनीता जावळे यांची निवड करावी

मुस्लिम, दलित व वडार समाजातील कार्यकर्त्यांची आ. रोहित पवारांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः खर्डा येथे उपसरपंच पदी दलित समाजातील सौ,सुनीता जावळे यांची निवड करावी- खर्डा येथील मुस्लिम, दलित व वडार समाजातील कार्यकर्त्यांनी आ ,रोहित पवार यांच्याकडे एखमुखी मागणी केली.
खर्डा येथे 9 फेब्रुवारी रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक होत आहे. आ,रोहित पवार सरपंच पदासाठी जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य राहील, परंतु उपसरपंचपदी दलीत समाजातील एकमेव निवडून आलेल्या सौ, सुनीता दीपक जावळे यांची निवड करावी अशी मागणी खर्डा येथील मुस्लिम, दलित व वडार समाजातील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली असून याबाबत आ,रोहित पवार लक्ष घालतील असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रा,पंचायत असून या निवडणुकीत माजी मंत्री राम शिंदे व आ,रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये अटीतटीची झाली दोन्ही नेत्यांनी खर्ड्यात पदयात्रा व सभेच्या माध्यमातून आरोप व प्रत्यारोप केले होते, निवडणूक निकालानंतर 17 पैकी 10 ग्रामपंचायत सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून आले आहेत तर भाजपचे 7 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी गटबाजी झाली होती परंतु आ,पवार यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या कडक निर्वानीच्या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गटबाजीला मोठा लगाम लागला आहे, तसेच येथील कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुस्लिम व वडार समाजातील एकही प्रतिनिधी नाही तर फक्त मागासवर्गीय समाजातून सुनीता जावळे या एकमेव ग्रामपंचायत सदस्या निवडून आल्या आहेत त्यांनाच उपसरपंच पदी निवड करावी अशी मागणी खर्डा येथील मुस्लिम, दलित व वडार समाजातील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे आ.रोहित पवार यांचे लक्ष वेधले आहे ते काय निर्णय घेतात यावरच खर्डा येथील उपसरपंच पद कोणत्या समाजाला मिळणार याबाबत खर्डेकरांची उत्सुकता ताणली गेली आहे.

No comments:

Post a Comment