भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 भास्करराव पेरे पाटील यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः जामखेड येथे एका कार्यक्रमात आदर्श गाव पाटोदा जि. औरंगाबाद येथील माजी संरपच व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी पत्रकारांना अपमानित करून अर्वाच्य भाषा वापरून पत्रकार हलकट, हरामखोर, बांडगूळ, व मी एक फकीर आहे माझे कोणीच काय करू शकत नाही अशा शिव्या देऊन एक धमकी दिल्या सारखे भाषणात बोलले या प्रकरणी भास्कर पेरे यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
जामखेड येथे दि. 31 जानेवारी रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह  येथिल एका कार्यक्रमात भाषणात स्वतः च्या गावातील पाटोदा ता. जि. औरंगाबाद येथील ग्रामपंचायत निवडणूकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून पत्रकारांना हलकट, हरामखोर, बाडगुळ, अशा शिव्या दिल्या होत्या व तसेच काय प्रिंट मिडीया व  इलेक्ट्रॉनिक मिडीया या पत्रकारांविषयी आर्वाच्च भाषा वापरून अपमानित केले होते. तेव्हा जामखेड मधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध करत तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.जामखेड येथे 4 फेब्रुवारी रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे जामखेड येथे पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन प्रसंगी आले आसताना त्यांना जामखेड पत्रकार यांनी निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती गृहराज्यमंत्री देसाई यांनी पोलीस अधीक्षक मनोज  पाटील यांना चौकशी करून  गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
निवेदन देताना  यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर,जेष्ठ पत्रकार मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मोहिद्दीन तांबोळी, समीर शेख  अविनाश बोधले, ओंकार दळवी,  जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे,  पप्पू सय्यद,  अजय अवसरे, दत्तराज पवार, फारूक शेख, , यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.  
त्यानुसार आज दि. 7 रोजी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here