ज्येष्ठ नागरिक गणपत खेडकर यांच्या हस्ते शुभारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

ज्येष्ठ नागरिक गणपत खेडकर यांच्या हस्ते शुभारंभ

 ज्येष्ठ नागरिक गणपत खेडकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रभाग क्रमांक 6 च्या विकास कामांचा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या, नगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र 6 मधील  ताठे मळा येथील सत्रे घर ते खेडकर घर ड्रेनेज लाईन आणि रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ आज  करण्यात आला.  नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि  महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उदघाटन संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक गणपत खेडकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
प्रसंगी महापौर बाबासाहेब  वाकळे, नगरसेविका वंदना ताठे, विलास ताठे, अरुण शिंदे, संजय सत्रे, प्रशांत शिंदे, अ‍ॅड. सुनील सूर्यवंशी, मनोज ताठे, गणपत खेडकर, योगिता सत्रे, पूनम ताठे, अनिता गुंजाळ, मंगल खेडकर, पूजा शिंदे, सुरेखा खेडकर, सुरेखा कापरे, सारिका सत्रे, यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.  महापौर वाकळे यांनी येत्या सहा महिन्यांत नगरमधील महत्वाचे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले. नगरसेविका वंदना ताठे म्हणाल्या की,प्रभागाचा विकास होणे गरजेचे आहे याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे.यामुळे रखडलेली कामे पूर्ण होत आहे.यांचा आनंद होत आहे.यात प्रामुख्यानं वीज,पाणी, रस्ता यांची कामे प्राधान्याने करत आहे.त्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment