दिल्ली येथील बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्मा यांच्या भ्याड हत्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 17, 2021

दिल्ली येथील बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्मा यांच्या भ्याड हत्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध

 दिल्ली येथील बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्मा यांच्या भ्याड हत्येचा विश्व हिंदू परिषदेतर्फे निषेध

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी राष्ट्रपतींकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सर्वोच्च न्यायालयाने श्रीराम जन्मभूमी मंदिर बांधण्यास अनुमती दिल्यानंतर या हेतूने ”श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र” न्यासाच्या वतीने देशभर निधी समर्पण अभियान चालू आहे.या संदर्भात दिल्ली शहरातील मंगोली पुरा भागातील कार्यकर्ता रिंकू शर्मा अन्य कार्यकर्त्यांसमवेत दररोज निधी संग्रहासाठी जात होता.हे न करण्यासाठी मुस्लिम युवक त्याला वारंवार धमक्या देत होते.या गोष्टींची स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.परंतु त्याबाबत काहीही कारवाई झालेली नाही.10 फेब्रुवारी रोजी आपल्या भावासोबत घरी आला.रात्री दहा वाजता मोहल्ल्यातील जिहादी मुस्लिम एकत्र होऊन त्याच्या घरात घुसले.सर्व कुटुंबीयांवर त्यांनी हल्ला केला.गॅस सिलेंडरचा स्फोट घडून सर्व कुटुंबीयांची हत्या करण्याचाही प्रयत्न केला.हल्ला करणार्‍या गुंडांच्या घरातील महिलांचा देखील यात समावेश होता.रिंकू यांच्या पाठीत सुरा त्याची हत्या केली गेली.रिंकूला दवाखान्यात नेल्यावर हल्लेखोर तेथेही आले.त्याच्या कुटुंबीयांना त्याला पुन्हा जखमी व रक्तबंबाळ करण्यात आले.त्यामुळे तो वाचू शकला नाही.                                                                                                                                      
दिल्ली येथील बजरंग दल कार्यकर्ता रिंकू शर्मा याच्यावर भ्याड हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.या घटनेचा नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद तीव्र निषेध करते.हत्या करणार्‍याला फाशी द्यावी.तसेच अन्य हल्लेखोरांवर रासुका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी,हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा.अशी राष्ट्रपतींकडे मागणी करून नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विश्व हिंदू परिषदेतर्फे नायब तहसीलदार आर.जी.दिवाण यांच्याकडे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी,शहर मंत्री मुकूल गंधे,सहमंत्री श्रीकांत नांदापूरकर,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दल जिल्हा सहसंयोजक भारत थोरात, शहर संयोजक दिग्विजय बसापुरे,बाली जोशी,सागर होनराव आदी यावेळी उपस्थित होते.                                                                                                              
पोलीस स्थानिक मुस्लिमांच्या दबावाखाली असल्याने आदींना वाचविण्याचा व घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत.दिल्लीत गेल्या काही दिवसात जे आधी मुस्लिमांकडून हिंदू युवकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यात काही जणांना प्राणही गमवावा लागला आहे.उदाहरण दाखल अंकित सक्सेना,ध्रुवा त्यागी,अंकित शर्मा,राहुल राजपूत ही नावे या संदर्भात सांगता येतील.संपूर्ण देशभरात अशा घटना घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.  पालघर जिल्ह्यात झालेली दोन हिंदू साधूची हत्या याचेच उदाहरण आहे.या सर्व हत्यामागे फुटीरतावादी,ढोंगी, धर्मनिरपेक्षतावादी व धर्मांतर करण्यात गुंतलेले यांचे समर्थन आहे.या विषयाची चौकशी व चर्चा देशभर होणे आवश्यक आहे.                                                                                                                      
राष्ट्रपती महोदय या हृदय द्रावक करणार्‍या घटनांमुळे हिंदू समाजात जो आक्रोश निर्माण झाला आहे.तो आपल्यापर्यंत पोहोचविण्या बरोबरच बजरंग दल आपल्यासमोर खालील मागण्या ठेवत आहे.रिंकू शर्माच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी तसेच त्यांच्या परिवारास एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.दिल्लीत वारंवार होणार्‍या हल्ल्यांसाठी दिल्ली पोलिसांना जबाबदार धरण्यात यावे.देशभर जिथे जिथे मुस्लिम बहुल क्षेत्र आहे.तेथे हिंदू युवकांना स्वसंरक्षणासाठी अधिकाधिक शस्त्र परवाने देण्यात यावे.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.    

No comments:

Post a Comment