दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी-प्रा.मोडक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी-प्रा.मोडक

 दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी-प्रा.मोडक

दादा चौधरी यांची 124 वी जयंती साजरी  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः थोर स्वातंत्र्य सेनानी कै.दादा चौधरी यांनी अनाथ विदयार्थ्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी राष्ट्रीय पाठशाळा व राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली.दादा चौधरींनी प्रसंगी तुरुंगवास भोगला. सत्याग्रहाचे नेतृत्व केले.लोकमान्य व नवशक्ती वृत्तपत्राचे संपादन केले.शिक्षणासाठी त्यांची तळमळ होती.दादा चौधरी यांच्या आदर्श जीवनाची व कार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.हिंदसेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयातर्फे सेनापती कै.कृष्णाजी नरहर तथा दादा चौधरी यांची जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय पाठशाळेतील दादा चौधरी यांच्या समाधीस्थळी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अजित बोरा म्हणाले कि,थोर स्वातंत्र्यवीर सेनानी दादा चौधरी यांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे आहे.दादा चौधरी विद्यालयात अनेक विद्यार्थी घडले आहेत.वंचित व दीनदुबळ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा.मधुकर साबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment