पल्स पोलिओ मोहिमेतील आरोग्य व अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

पल्स पोलिओ मोहिमेतील आरोग्य व अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सन्मान

 पल्स पोलिओ मोहिमेतील आरोग्य व अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सन्मान

केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पल्स पोलिओ मोहिम यशस्वीपणे पुर्ण करुन समर्पित भावनेने कार्य करणार्या केडगाव येथील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व सफाई कर्मचारी यांचा केडगाव जागृक नागरिक मंचतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना विशाल पाचारणे म्हणाले की, सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व सफाई कर्मचारी योगदान देत असतात. पल्स पोलिओ मोहिमदेखील त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी होते. कोरोनाच्या संकटकाळात देखील त्यांनी योगदान देऊन देवदूताची भूमिका पार पडली. त्यांचे ऋण न फेडता येण्यासारखे असून, त्यांची अविरतसेवा ही समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महेश येवले, मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे, सिकंदर शेख, शाकीर शेख, आयाज शेख, शुभम बोरुडे, मल्हारी पाचारणे, सलीम शेख, शोहेब शेख, बाळासाहेब पाचारणे, अल्ताफ पठाण, जालिंदर वडेवाले, अभिजीत काळे, बच्चू कोतकर, कचरू पाचारणे, संतोष पाचारणे, गणेश पाचारणे, कल्पना चेमटे, सीमा घुले, प्रवीण पाटसकर, अनिल मरकड, एकनाथराव पाचारणे, रेणुका लोंढे, वनश्री राऊत, अश्विनी जोशी, विमान गुंजाळ, ज्योती क्षीरसागर, शिवानी वाघ, संगीता खामकर, सुजाता गाडीलकर, कविता सातपुते, अर्चना ढुमणे, रुक्मिणी शेंडगे, अनुराधा तुंगार, वैजंती सांगडे, बबीता भाबरकर, अमिता वाळुंजकर, कल्पना जाधव, आरती माने, छाया केळगंद्रे, अश्विनी पाचारणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here