अमित जाधव यांच्या उपोषण व आ.लंके यांच्या पाठपुराव्याला यश ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

अमित जाधव यांच्या उपोषण व आ.लंके यांच्या पाठपुराव्याला यश !

 अमित जाधव यांच्या उपोषण व आ.लंके यांच्या पाठपुराव्याला यश !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः गेली अनेक वर्षे रखडलेले रमाई आवास योजनेचे शेकडो प्रकरणे प्रशासनाच्या उदासिनते मुळे प्रलंबीत होते. अनेक वेळा लेखी निवदने देवूनही कुठलीही कारवाही होत नसल्या कारणाने युवा नेर्तुत्व अमीत जाधव यांनी पारनेर नगर पंचायतीच्या प्रांगणात उपोषण केले होते.त्याची दखल घेत मंगळवारी सदर रमाई घरकुल योजने अंतर्गत पारनेर शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील घरकुलांचे प्रस्ताव स्विकारायला पारनेर नगर पंचायत मध्ये सुरुवात झाली.अमित जाधव हे शेकडो लाभार्थ्यां सहित 24/2/2020 रोजी नगरपंचायत कार्यालया समोर,रमाई आवास योजने अंतर्गत घरकुले मंजूर करावी या साठी उपोषणास बसले होते.सातत्याने अमित जाधव यांनी प्रशासकीय अधिकारी,तसेच पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेशजी लंके यांच्या कडे पाठपुरावा केला होता,अखेर त्याला मोठे यश मिळाले आहे.मागील 4 वर्षा पासून रमाई आवास योजना कक्षच कार्यान्वित नव्हता सादर बाब लक्षात आल्यानंतर अमित जाधव यांनी या बाबत आवाज उठवला होता, आमदार निलेशजी लंके यांच्याकडे पाठपुरावा देखील केला होता.त्या नंतर मुख्याधिकारी डॉ.कुमावत मॅडम यांनी सादर कक्ष स्थापन करीत,यास प्रतिसाद दिला.रमाई आवास योजने साठी पारनेर शहरातील, अनुसूचित जातीच्या  लोकांनी लवकरात लवकर नगरपंचायतकडे प्रस्ताव सादर करावे,असे आव्हान अमित जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment