निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेतर्फे प्रथम कर्ज वितरण ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेतर्फे प्रथम कर्ज वितरण !

 निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेतर्फे प्रथम कर्ज वितरण !


नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः आ. निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांच्या हस्ते संस्थेच्या प्रथम कर्ज प्रकरणाचे वितरण करण्यात आले.
     नगर विधानसभा मतदार संघातील महिलांना आर्थिक,सामाजिक, व्यवसायिक, शैक्षणिक सक्षम बनविण्यासाठी आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून या महिला कल्याणकारी संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी विविध ध्येय धोरणे, शासनाच्या विविध योजना,गृह उद्योग या सह सर्व अटी व नियमा प्रमाणे मा. निलेश लंके महिला कल्याणकारी संस्था कार्य करत आहे .सोमवारी पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सदर संस्थेच्या अध्यक्ष सविता ढवळे, सचिव श्रामिनी चौधरी यांच्यासह महिला संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे प्रथमच कर्ज प्रकरणाचे वितरण करण्यात आले. निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेची स्थापना चार महिन्यापूर्वी पारनेर येथील  आमदार निलेश लंके जनसंपर्क कार्यालया शेजारी सुरू करून या संस्थेच्या माध्यमातून महिला भगिनींना सक्षम बनविण्यासाठी कार्यान्वित केलेल्या या संस्थेत अल्पावधीतच मतदार संघातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सदर संस्थेला हजारो सभासद मिळाले असून त्या सर्व महिला लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्याचा व महिलांना सक्षम करण्याची दूरदृष्टी ठेवून आमदार निलेश लंके यांनी सोमवारी पळवे येथील आदर्श स्वयं सहाय्यता महिला बचत गटातील किमान दहा महिला बचत गटांना किमान दोन लक्ष रुपये कर्जाचे वाटप आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून ज्या लाभार्थी बचत गटांना कर्ज दिले गेले त्यांनी कर्ज वेळेत भरण्याचे अवाहन केले.आपल्या बचत गटाच्या माध्यमातून महीला भगीणींचे सक्षमीकरण करण्यासाठी हा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील असा शब्द आमदार निलेश लंके यांनी लाभार्थी बचत गटातील महिलांना दिला.
या संस्थेच्या प्रथम कर्ज वितरण प्रसंगी सौ.मंगल पाचारणे यांच्या सह बचत गटातील सर्व सदस्य यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी,सदस्य व हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment