20 फेब्रुवारीस श्रीगोंद्यात माळी समाज वधू-वर परिचय मेळावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 9, 2021

20 फेब्रुवारीस श्रीगोंद्यात माळी समाज वधू-वर परिचय मेळावा

 20 फेब्रुवारीस श्रीगोंद्यात माळी समाज वधू-वर परिचय मेळावा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः जोतीराव फुले चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर व अस्तित्व फाउंडेशन श्रीगोंदा यांचे संयक्त विद्यमाने बालाजी मंगल कार्यालय, श्रीगोंदा, जि. अहमदनगर येथे शनिवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 ते 5:30 या वेळेत राज्यस्तरीय माळी समाज विवाह इच्छुक नव वधू- वर व विधवा, विधुर, घटस्फोटीत पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील माळी समाज विवाह इच्छुक वधू-वर व त्यांचे पालक यांनी उपस्थित राहुन वधू-वरांची नाव नोंदणी करण्याचे आवाहन मेळावा आयोजक सुधाकर बोराटे, अ‍ॅड. नवनाथ फोंडे, अ‍ॅड. हरिश्चंद्र राऊत, गोरख आळेकर व जिवननाथ खीलारे व आकाश रासकर यांनी केले आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या प्रचलित युगामुळे आता विभक्त कुटुंब पद्धती समाजात जास्त रूजत असल्याने घरातील जाणत्या मंडळीकडे दुर्लक्ष होत आहे. आत्ताच्या आधुनिक जगात मुला मुलींचे विवाह जुळवायचे असतील तर उपवर पालक परिचय मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे असुन श्रीगोंदा येथे होत असलेला हा मेळावा क्र.16 वा आहे. मेळाव्यासाठी येताना वधू- वर यांनी स्वत:ची माहिती बायोडाटा व आयकार्ड साईज रंगीत दोन फोटो आणावेत.वधू-वर यांचेसोबत त्यांचे पालक किंवा एक नातेवाईक यांना सोबत आणावे.जेणेकरून अपेक्षित वधु-वर व त्यांचे पालकाशी चर्चा करता येईल. यासाठी 9561190332, 9881055696, 9422231576, 9545454730 या मोबाईल वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment