भारतीय नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

भारतीय नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार

 भारतीय नौदलात रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय नौदलात देशसेवेसाठी रुजू झाल्याबद्दल यश रणसिंग या युवकाचा कास्ट्राईब महासंघाचे कार्याध्यक्ष वसंत थोरात यांनी सत्कार केला. यावेळी दत्ता रणसिंग, सुनिल थोरात, लक्ष्मणराव सांगळे, हर्ष रणसिंग आदी उपस्थित होते.
यश हा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अहमदनगर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता रणसिंग यांचे चिरंजीव आहे. भारतीय नौदलाच्या भरतीत पात्र होऊन खडतर प्रशिक्षण पुर्ण करुन नुकतेच तो विशाखापट्टणम येथे देशसेवेच्या कार्यासाठी रुजू झाला आहे. वसंत थोरात म्हणाले की, जिद्द व परिश्रमाच्या बळावर स्वप्न साकार होत असतात. सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने स्वत:च्या कर्तृत्वावर भारतीय नौदलात भरती झाली असून, ही भुषणावह बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment