महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात.

 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी उत्साहात.

रंगतदार कुस्त्यांचा थरार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 64 वी वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020-21 स्पर्धेसाठी नगर शहर तालीम सेवा संघाच्या वतीने सर्जेपुरा येथील छबु पैलवान तालीम येथे शहराची निवड चाचणी उत्साहात पार पडली. यावेळी शहरातील मल्लांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला तर मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचे सामने रंगले होते.
माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करुन व कुस्ती लावून निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै.नाना डोंगरे, उपमहाराष्ट्र केसरी पै.अनिल गुंजाळ, पै.विलास चव्हाण, नगर शहर तालिम संघाचे अध्यक्ष पै.नामदेव लंगोटे, उपाध्यक्ष सुनिल भिंगारे, बजरंग महांकाळ, सचिव मोहन हिरणवाळे, कार्याध्यक्ष अजय अजबे, खजिनदार कैलास हुंडेकरी, पै.काका शेळके, पै.संग्राम शेळके, सुरेश आंबेकर, तुषार अरुण आदींसह मल्ल उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात कुस्ती मल्लांचे मोठे नुकसान झाले. सराव, व्यायाम व खुराकाचा प्रश्न बिकट बनला असताना शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या कुस्ती स्पर्धा जाहीर झाल्या असून, त्या अनुशंगाने निवड चाचणी स्पर्धा कोरोनाच्या नियमांचे पालन करुन होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी नगरसेवक संभाजी लोंढे यांनी अहमदनगर जिल्ह्याला कुस्तीचा मोठा इतिहास व परंपरा आहे. कुस्तीची आवड असलेल्या युवकांनी या क्षेत्राकडे करिअर म्हणून पहावे. अनेक उत्तम कुस्तीपटू पुढे येत असून, कुस्तीपटूंनी सराव व व्यायाम न थांबविण्याचे त्यांनी आवाहन केले. या निवड चाचणीत राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी गटसाठी 86 ते 125 किलो वजनगटासाठी (गादी व माती) निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विजयी मल्ल गादी विभागसाठी सौरभ जाधव, कौस्तुभ आंबेकर, लक्ष्मण धनगर, चैतन्य शेळके, विशाल मेहेत्रे, ऋषीकेश लांडे, राहुल ताकवणे, युवराज खैरे, माती विभागासाठी करण मिसाळ, निखील शिंदे, किरण धनगर, बंटी साबळे, मयुर जपे, आदेश डोईजड, तर महाराष्ट्र केसरी गटासाठी तुषार अरुण (माती) व महेश लोंढे (गादी) या मल्लांची जिल्हा निवडचाचणीसाठी पात्र ठरले आहे. या निवडचाचणीसाठी पंच म्हणून पै.संभाजी निकाळजे व पै. नाना डोंगरे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment