शिवरायांच्या पावन भूमीत माझा पुनर्जन्म व्हावा! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

शिवरायांच्या पावन भूमीत माझा पुनर्जन्म व्हावा!

 शिवरायांच्या पावन भूमीत माझा पुनर्जन्म व्हावा! शिवभक्त सुमित श्रीवास्तव यांनी व्यक्त केली भावना.

ड्रीम सिटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मी सहा वर्षांपूर्वी परराज्यातून महाराष्ट्रात आलो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने प्रभावित झालो. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यांना मी भेट दिली. माझा पुढचा जन्म शिवरायांच्या महाराष्ट्रात व्हावा अशी प्रार्थना मी याप्रसंगी परमेश्वराजवळ व्यक्त करतो अशी भावना शिवभक्त सुमित श्रीवास्तव यांनी व्यक्त केली. ड्रीम सिटी येथे मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आर्या शिंदे, मानसी काळे, अनुष्का भगत, श्रेया उंडे, डींपल झावरे, गायत्री रोहकले, इ. लहान मुलांमुलींनी छत्रपती शिवाजीमहाराजांचे पोवाडे सादर केले. त्यावेळी श्रोत्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी अतुल डांगा, अक्षय कासवा, पोपट चंदन, शोभाचंद शिंदे, कैलास काळे, अमोल ठाणगे, राहुल झावरे, संतोष मेहत्रे, किरण बनकर, सागर रोहकले, अमोल गाली, संजय टाक, शहाजी काळे, नितीन चेमटे.

No comments:

Post a Comment