दशमीगव्हाण सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काळे तर उपाध्यक्ष पदी गंगाधर काळे यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

दशमीगव्हाण सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काळे तर उपाध्यक्ष पदी गंगाधर काळे यांची बिनविरोध निवड

 दशमीगव्हाण सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब काळे तर उपाध्यक्ष पदी गंगाधर काळे यांची बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दशमीगव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी बाळासाहेब मालू काळे तर उपाध्यक्ष पदी गंगाधर तात्याबा काळे यांची बिनविरोध निवड झाली.
दशमीगव्हाण विविध कार्यकारी सेवा संस्थेचे कार्यालयात आयोजित विशेष बैठक निवडणूक निर्णय आधिकारी ए ए शेख यांच्या अध्यक्षतेखालील पार पडली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून यु एस कांबळे यांनी मदत केली. चेअरमन पदाच्या नावाची सूचना सुधीर काकासाहेब काळे यांनी मांडली त्यास गोरख माहळु काळे यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्ष पदाची सूचना लक्ष्मण दादासाहेब शिंदे यांनी मांडली त्यास अनुमोदन विजय मनोहर काळे यानी दिले.
बैठकीस संस्थेचे नूतन संचालक बाळासाहेब राधाकिसन काळे, विजय मनोहर काळे, पोपट मोहन काळे, गोरख महाळु काळे, सुधीर काकासाहेब काळे, भाऊ धोंडिबा काळे, लक्ष्मण दादासाहेब काळे, पोपट केरू कांबळे, सुमन मुरलीधर काळे, सलिमा बाबा शेख आदी संचालक उपस्थित होते.
उपसरपंच बाबासाहेब काळे, माजी सरपंच भाऊसाहेब काळे, बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, सूर्यकांत काळे, जयसिंग सुखदेव काळे, बाबा शेख आदी उपस्थित होते. नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment