सरकारच्या महसूलात होणारी घट देशावरील कर्ज वाढवणारी- डॉ. प्रमोद लोणारकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

सरकारच्या महसूलात होणारी घट देशावरील कर्ज वाढवणारी- डॉ. प्रमोद लोणारकर

 सरकारच्या महसूलात होणारी घट देशावरील कर्ज वाढवणारी- डॉ. प्रमोद लोणारकर

नगर कॉलेजमध्ये ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थसंकल्प 2021’ या विषयावर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्रमुख डॉ.प्रमोद लोणकर व्याख्याते म्हणून लाभले. विभागप्रमुख डॉ पराग कदम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
अर्थसंकल्पावरील आपल्या व्याख्यानात डॉ. लोणारकर यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदीसंदर्भात भाष्य करतांना म्हणाले की, अर्थसंकल्प हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे प्रत्येकाने यासंदर्भात सजग असले पाहिजे. तसेच, अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प तयार करण्याच्या पद्धती, अर्थसंकल्प तयार करताना कोणती काळजी घेतली जाते?  यासारख्या मुलभूत संकल्पना स्पष्ट करत लोणारकर यांनी सरकारच्या महसूल (उत्पन्न) आणि खर्च यावर विस्ताराने भाष्य केले. सरकारच्या महसुलाचे स्त्रोत आणि खर्चाचे मार्ग सांगत त्यांनी सरकारचे स्वत:चे उत्पन्न आणि खर्च आणि सरकारवरील वाढत्या कर्जाचा आढावा घेतला. कोरोना पार्श्वभूमीवर गेले वर्षभर सरकारी महसुलावर आलेली बंधणे तर दुसरीकडे वाढलेला खर्च यामुळे वाढणार्या वित्तीय तुटीवर प्रकाश टाकला.या वर्षात आणि पुढील वित्तीय वर्षातही सरकारचा महसूल घटणार असल्याने सरकारवरील कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारवरील कर्ज मर्यादेबाहेर वाढल्यास त्याचे आर्थिक विकासावर परिणाम होतात, याची दखल घेतली जावी अशी अपेक्षा डॉ.लोणारकर व्यक्त केली.या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी कु. अपूर्वा लहाडे, कु. श्वेता यादव, कु. अपेक्षा फासले यांनी अर्थसंकल्पावर सादरीकरण केले.  या परिसंवादासाठी जगन्नाथ गव्हाणे, डॉ. परमेश्वर गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहिली. याबरोबरच, विभागातील माजी विद्यार्थी राहूल सानप यांच्यासह अर्थशास्त्र विभागातील आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ पराग कदम यांनी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ माधव शिंदे यांनी तर आभार डॉ भागवत परकाळ यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment