काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा- पो.नि. गायकवाड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा- पो.नि. गायकवाड

 काळजी घ्या सोन्यासारखा जीव वाचवा- पो.नि. गायकवाड

सोनसाखळी चोरीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनात्मक फलकाचे अनावरण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अनेक घटनांमधून अनेक ठिकाणी सोनसाखळी चोर्यांमधून महिलांना जीव गमवावे लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. आपला जीव हा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, तेव्हा महिलांनी सोने घालून फिरतांना काळजी घ्या व आपला सोन्यासारखा जीव वाचवा, असे आवाहन तोफखाना पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी केले.सावेडी भागातील उपनगरात गेल्या अनेक दिवसांपासून सोन साखळ्यांची धूम स्टाईलने चोर्या होत आहेत. अहमदनगर पोलिस दलातर्फे दक्ष नागरिक व सुरक्षित परिसर होण्यासाठी प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले. श्रीराम चौकातील फलकाचे अनावरण श्री.गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महिला व नागरिकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
श्री. गायकवाड पुढे म्हणाले, महिलांनी थोडी सावधानता वाळगून सुरक्षितपणे दागिने सांभाळले तर या घटना घडणार नाहीत. गळ्यातील दागिने स्कार्प, ओढणी, पदराने झाकल्यास चोरट्यांना हिसकविता येणार नाही. सहजपणे ओढता येणार नाही. महिलांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे म्हणजे समोरुन येणार्या मोटार सायकलस्वाराच्या हाताच्या अंतरपेक्षा जास्त अंतर ठेवून चालावे. कोणी पत्ता विचाराण्यासाठी थांबल्यास अनोळखी व्यक्तीशी बोलणे टाळावे किंवा सुरक्षित अंतर ठेवून बोलावे, असे सांगितले.
नगरसेवक त्र्यंबके म्हणाले, आपणच आपली काळजी घ्यावी, रात्रीच्यावेळी महिलांनी निर्जनस्थळी एकटे जाणे टाळावे. गर्दीच्या व मोठ्या रस्त्याचा वापर करावा. कोणी अनोळखी, संशयित तरुण वाहन चालवतांना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या, असे सांगून पोलिसांनी प्रबोधन फलक लावून जनजागृती केली. त्यावरील नंबर नागरिकांनी घेऊन कुठे घटना घडल्यास बघ्याची भुमिका न घेता संपर्क करा, असे केले तर या घटना घडणार नाहीत, असे ते म्हणाले. चौका-चौकात लावलेल्या या फलकांचे नागरिक वाचन करीत असून, पोलिसांना सहकार्य करण्याची भुमिका घेतील, असा विश्वास पो.उपनिरिक्षक समाधान सोळंके यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, पोलिस उपनिरिक्षक समाधान सोळंके, सहाय्यक फौजदार आढाव, योगेश पिंपळे, अमित गाडे, निखिल त्र्यंबके, दत्तात्रय कोकाटे, हरिभाऊ संत, अण्णा आदकोटी, संजय लावंड आदिंसह श्रीराम चौकातील कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here