गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध ऑनलाईन स्पर्धेतील यशाबद्दल गौरव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध ऑनलाईन स्पर्धेतील यशाबद्दल गौरव

 गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध ऑनलाईन स्पर्धेतील यशाबद्दल गौरव


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाकाळात पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन स्पर्धेत कृतिशील सहभाग घेऊन यश मिळविले .त्याबद्दल या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील प्रमाणपत्रे मिळाली आहेत .शाळा बंद असल्यामुळे ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी यांचे हस्ते वितरीत करून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.कोरोनाकाळात  शाळा बंद असल्या तरी गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण उपक्रमशील प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ आणि त्यांचे सहकारी शिक्षक नवनाथ आंधळे उत्कृष्टपणे सुरू ठेवले.या शिक्षणात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा सुरेख संगम साधण्यात आला.
या काळात विविध स्पर्धेबाबत तुकाराम अडसूळ व नवनाथ अंधळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी या विविध प्रकारच्या ऑनलाईन स्पर्धेत कृतिशील सहभाग घेतला.कोरोनाबाबत बाबत विविध संस्थेने आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा ,डॉ.ए. पी.जे .अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशन रामेश्वरम तामिळनाडू यांच्या वतीने पुस्तके वाचन स्पर्धा ,
स्वीडन देशातील इको ट्रेनिंग सेन्टर च्या वतीने पर्यावरण संवर्धन व प्रदूषण निवारण बाबत स्पर्धा  आणि आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त विद्यार्थी भाषण, संदेश स्पर्धा आयोजित केल्या होत्या .या स्पर्धेत गितेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले.त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र पाठविण्यात आले.हे विविध प्रमाणपत्र शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम अडसूळ ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,शिक्षक नवनाथ आंधळे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव गिते यांनी प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रदान करून त्यांचा गौरव केला .यामुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना अतिशय आनंद झाला.गावातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment