शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या दुधाच्या किंमतीत लॅक्टॅलीसकडून वाढ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या दुधाच्या किंमतीत लॅक्टॅलीसकडून वाढ

 शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या दुधाच्या किंमतीत लॅक्टॅलीसकडून वाढ

3.5 /8.5 गुणवत्तेच्या गायीच्या दूधासाठी प्रतीलिटर 30 रुपये देणार * 50,000 हून जास्त दूध उत्पादक शेतकर्‍यांना लाभ मिळणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः डेअरी क्षेत्रात जगातील अग्रगण्य लॅक्टॅलीस महाराष्ट्रात सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (प्रभात ब्रँडची मालकी असलेला) या नावाने कार्यरत असून, त्यांनी शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या दूधाच्या किमतींमध्ये प्रती लिटर किमान एक रुपया वाढ करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. या वाढीव दर देण्याच्या निर्णयानुसार, लॅक्टॅलीस आता 3.5 / 8.5 एसएनएफ (सॉलिड नॉन फॅट) गुणवत्तेच्या दूधासाठी प्रती लिटर 30 रुपयापेक्षा जास्त दर दूध उत्पादक शेतकर्‍यांना देणार आहे. ही वाढ लगीच लागू करण्यात आली आहे.

बहुतांश महत्त्वाच्या उत्पादक सहकारी संघटनांसहित अन्य डेअरींची महाराष्ट्रातील सरासरी खरेदी किंमत ही प्रती लिटर 30 रुपयांपेक्षा कमी आहे. या निर्णयामुळे लॅक्टॅलीस ही राज्यातील खरेदी किंमतीमधील अग्रणी कंपनी बनली आहे. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, पुणे आणि नाशिक या भागांत दूध पुरवठा करणार्‍या 50,000 हून जास्त दूधउत्पादक शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार आहे. कोव्हीड महासाथीच्या उद्रेकानंतर दूध खरेदी किंमतीत झालेल्या घसरणीमुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्‍याला या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. एकूणच, गेल्या काही काळापासून दूध उत्पादक शेतकर्‍यांची दूध खरेदी किंमतीमध्ये दरवाढ व्हावी, अशी अपेक्षा होती.
येत्या उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची देखभाल करण्यासाठी आणि आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी कंपनीशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना या दरवाढीमुळे मोठी मदत मिळणार आहे. कोव्हीड च्या संकटानंतर व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकर्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असल्याने त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे, अशी कंपनीची भावना आहे.
याबाबतीत आपले मत व्यक्त करताना सनफ्रेश अ‍ॅग्रो- लॅक्टलीस समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. राजीव मित्रा म्हणाले, लॅक्टॅलीसमध्ये सर्वत्र आणि सनफ्रेशमध्येही, दूध उत्पादक शेतकरी हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या टाळेबंदीमुळे दूधाच्या आणि दुग्धउत्पादनांच्या मागणीत झालेल्या घसरणीचा फटका शेतकर्‍यांना सहन करावा लागला. कोव्हीडचा प्रभाव कमी झाला असून बाजार पुन्हा खुले झाले असल्याने आता सर्वात आधी आम्हाला शेतकर्‍यांपर्यंत लाभ पोहोचवायचा आहे.  यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून बाजारातून याला सकरात्मक प्रतिसाद मिळेल आणि इतर कंपन्यादेखील आमच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या शेतकर्‍यांना वाजवी किंमत देऊ करतील अशी मला अपेक्षा आहे.
आता टाळेबंदी-पश्चात रेस्टॉरंट, हवाईसेवा तसेच संस्थात्मक खरेदीदार यांसारखी व्यावसायिक क्षेत्रे कामकाज पूर्ववत करत आहेत. त्यामुळे दूग्धजन्य घटक आणि अन्य स्त्रोतांना मागणी वाढते आहे. देशात महाराष्ट्र राज्य हे दूग्धजन्य घटक तसेच स्त्रोतांचा मुख्य पुरवठादार मानले जाते. त्यामुळे मागणी वाढली, मोठ्या प्रमाणावरील दूधाची भुकटी, चीज यांचे दर वाढले. लॅक्टॅलीसकडून दूध खरेदीचे भाव वाढविण्यात आले असले तरीही तूर्तास ग्राहकांवर त्याचा परिणाम होणार नाही.
पंतप्रधानांनी संसदेत नुकत्याच केलेल्या भाषणामध्ये डेअरी उद्योगाचा देशाच्या जीडीपीतील योगदानाचा उल्लेख केला. काळाच्या कसोटीवर दूध उत्पादन उद्योग खरा उतरला असल्याचे नमूद करून त्यांनी मजबूत पुरवठा साखळी आणि सर्व भागधारकांची उत्तम काळजी घेत असल्याबद्धल या उद्योगाचे कौतुक केले. सनफ्रेश (लॅक्टॅलीस) सारख्या कंपन्या शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य आणि शेतकर्‍यांपासून ते ग्राहकांपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी सेवा देऊ करत असल्याने उद्योगक्षेत्राचे चांगले दिवस पुन्हा परत आले आहेत असे आता वाटते आहे.
लॅक्टॅलीस-सनफ्रेश ही या क्षेत्रातील एक अग्रणी डेअरी कंपनी आहे. पारदर्शक दूध खरेदी पद्धत आणि गुणवत्ता, वेळेत पैसे देणे, पशूखाद्य आणि खनिज मिश्रणावर अनुदान, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण, बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी मदत, दिवाळी बोनस आणि इतर असे इतर अनेक लाभ देऊ करणारी कंपनी अशी तिची ओळख आहे.

No comments:

Post a Comment