शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...

 शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...

शिवरायांना अभिवादन!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी॥ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी आज शिवरायांना अभिवादन केले. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही शिवजयंती साजरी करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन..
शिवजयंतीचे औचित्य साधून.शिवसेनेच्या वतीने स्टेशन रस्त्यावरील छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यास अभिवादन करताना सेनेचे युवा प्रमुख विक्रमभाऊ राठोड समवेत  नगरसेवक बाळालसाहेब बोराटे, पहिले माजी महापौर भगवानजी फुलसौंदर, नगरसेवक शाम नळकांडे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अभिवादन..
छत्रपती शिवाजी महाराज प्रजाहितदक्ष होते, आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत शिवाजी महाराज कमालीचे दक्ष होते.  प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून गणले जात.  छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी असलेली परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण केले. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गणेश राऊत, नामदेव दहिंडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

काँग्रेसच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी..
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. शिवजयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. नगर शहरामध्ये काँग्रेस कार्यकर्ते काम करत असताना महाराजांच्या लोकांच्या सेवेच्या कामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत असतात. हे काम करताना सर्व समाज घटकांना बरोबर घेत काम करण्याची भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमी असते, असे यावेळी काळे म्हणाले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, निजाम जहागीरदार, अनिस चुडीवाल, डॉ.मनोज लोंढे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्रा.डॉ.बाळासाहेब पवार, प्रवीण गीते, अन्वर सय्यद, मुबीन शेख, सुजित जगताप, निखिल गलांडे, नलिनी गायकवाड, कौसर खान, नीता बर्वे, सुनिता बागडे, उषा भगत, जरीना पठाण, ऋतिक शिरवाळे, कॅ.रिजवान शेख, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, ड.सुरेश सोरटे, अजय मिसाळ, शंकर आव्हाड, फहिम इनामदार ऋषिकेश चितळकर, वैभव कांबळे, शिवम करांडे, अनविश गुंड, तन्मय सांगळे, ओम जगताप, तन्मय गुंड, संकेत गवळी,अमित गुंड आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजपच्यावतीने  छत्रपती शिवाजी महाराज व प.पू गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराज व्यक्ती नसून एक विचार आहे. व्यक्ती नष्ट होतात पण विचार नष्ट होत नाही आणि अशा विचारांना घडविण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त केले. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. केंद्रातील भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. या स्मारकाच्या माध्यमातून जगाला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले. भाजपच्यावतीने  लक्ष्मी कारंजा येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू गोळवलकर गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत.  आणि इथून पुढेही येणार्या पिढ्यांना ते कायम स्फूर्तिस्थानी राहणार आहेत. त्यांचे कार्य स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आचारण केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, एक आदर्श राजा, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, नव्या युगाचा निर्माण करणारा, दुर्जनांचा नाश करता, सज्जनांचा कैवारी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जगभर केला जातो. त्यांचे कार्य आपणासर्वांना प्रेरणादायी असेच आहे. हीच प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेऊन राष्ट्र निर्माण कार्यास हातभार लावला आहे. यामध्ये गोळवलकर गुरुजींचे योगदान मोठे आहे. जनसामान्यापर्यंत संघाचे कार्य पोहचविण्याचे काम गुरुजींनी केले. आपणही राष्ट्र कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.विवेक नाईक यांनी केले तर आभार अनिल सबलोक यांनी मानले. याप्रसंगी डॉ.विलास मढीकर, अभिजित ढोणे, अजय ढोणे, संदिप मुनोत, लक्ष्मीकांत तिवारी, आशिष आनेचा ज्ञानेश्वर काळे, तुषार पोटे, गोपाल वर्मा, सुनिता सामल, नम्रता सग्गम, ज्योती दांडगे, सुजाता औटी, संजय ढोणे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव, सुभाष जाधव आदिंसह कार्यकर्त उपस्थित होते. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, उपमहापौर मालनताई ढोणे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनिल रामदासी, अनिल सबलोक, अजय चितळे, अ‍ॅड.विवेक नाईक, पंकज जहागिरदार, शिवाजी दहिंडे, वसंत राठोड, सुरेखा विद्ये, अंजली वल्लाकट्टी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here