कोपरगाव-शिर्डी रस्ता बनला मृत्यूचा सापळा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

कोपरगाव-शिर्डी रस्ता बनला मृत्यूचा सापळा...

 कोपरगाव-शिर्डी रस्ता बनला मृत्यूचा सापळा...

रस्ता दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी


कोपरगाव -
शिर्डी रस्त्यावर अनेक मोठे खड्डे पडलेले आहे. यामुळे अपघात घडुन अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी तातडीने आदेश निर्गमित करावेत’, अशी मागणी संजीवनी फाऊंडेशनचे सचिव युवानेते सुमित कोल्हे यांनी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनमाड- अहमदनगर या महामार्गातील कोपरगाव-शिर्डी या रस्त्याची लॉकडाऊनच्या आधीपासुन अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे आहेत. यामुळे होणार्‍या अपघातांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. दोन दिवसापूर्वी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरूण प्रा. ऋषिकेश विजय भागवत हे दुचाकीने कर्तव्यावर येत असता त्यांचा सावळीविहीर जवळ असलेल्या खड्ड्यात अपघात झाला, ते खाली कोसळले आणि मागुन येणार्‍या भरधाव वाहनाने त्यांना चिरडले
या काळीज पिळवटून टाकणार्‍या परीस्थितीमुळे त्यांची जागीच प्राणज्योत मालवली. अशा अनेकांना या जगाचा जबरदस्तीने निरोप घ्यावा लागला. यात कोणाचे पती, भाऊ, एकुलते एक मुलं मृत्यमुखी पडून अनेकांचे वडीलांचे छत्रच हरपले. प्रशासनाच्या अनास्थेमुळे अनेक कुटूंबे उद्ध्वस्त होत आहेत. यास रस्त्याची दुरावस्था प्रामुख्याने कारणीभुत आहे. सध्या सर्व शाळा, महाविद्यालये, विविध आस्थापना, कारखाने चालू झाल्यामुळे या स्त्यावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. राज्यातील हा एक प्रमुख महामार्ग म्हणुन या रस्त्याची ओळख आहे. रस्ता दुरूस्त होणे बाबत आजपर्यंत अनेक निवेदने, विनंत्या संबंधितांना केल्या असुन कोणतीही कार्यवाही होत नाही. यामुळे नागरीकांची सहनशक्ती संपली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आदेश निर्गमित करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here