क्रीडा महर्षी किसन आरकल स्फूर्ती पुरस्कार शाहीर अरुण आहेर यांना जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

क्रीडा महर्षी किसन आरकल स्फूर्ती पुरस्कार शाहीर अरुण आहेर यांना जाहीर

 क्रीडा महर्षी किसन आरकल स्फूर्ती पुरस्कार शाहीर अरुण आहेर यांना जाहीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः विचारधारा, जिज्ञासा अकादमी व मातृ संघटना राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्तपणे देण्यात येणारा क्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कारअहमदनगरमधील ज्येष्ठ राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्तेशाहीर अरुण आहेर  यांना जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे व विचारधाराचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल अंभी बुलबुले यांनी दिली.2018 पासून क्रीडा महर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कार दिला जात आहे. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतीचिन्ह, पुस्तके आणि रोख रक्कम असे असूनआज पर्यंतचे मानकरी कोल्हापूरचे बाबा नदाफ, अहमदनगरचे दत्ता अंकम, विवेक पवार आहेत तरया वर्षी अरुण आहेर यांची निवड करण्यात आली.  स्थानिकपुरस्कारनिवडसमितीमध्ये  सेवादलसंघटक बापू जोशी, शिवाजी नाईकवाडी, गोविंद आडम, विवेक पवार, दत्ता अंकम हे असून यांनी केंद्रीय निवड समितीकडे नावेदिली त्यातून अरुण आहेर यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिज्ञासा अकादमीच्या प्रा.; संगीता गाडेकर यांनी दिली.
एस.एम.जोशी फाउंडेशन पुणे येथे निवड समितीचे अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व एस.एम जोशी फॉन्डेशनचे सचिव, प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीयनिवड समितीची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीचे सदस्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, (धुळे ) छात्रभारतीच्या प्रा.बिना सावंत (अकोले) डॉ.उदय महाले, व्यंकटेश आरकल, युनुसतांबटकर(पुणे) व निवड समितीचे निमंत्रक विठ्ठल बुलबुले हे उपस्थित होते. त्या बैठकीत अरुण आहेर यांनाक्रीडामहर्षी किसनराव आरकल स्मृती पुरस्कार देण्याचा अंतिम निर्णय झाला.
अरुण आहेर हे लहानपणापासून राष्ट्र सेवालाचे सैनिक आहेत. गेली 50 वर्ष ते सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात आणि वारकरी संप्रदायात सक्रीय आहेत.राष्ट्र सेवा दलाच्या राज्यातील अनेक जिल्ह्यात व देशातील अनेक राज्यात त्यांनी मैदानी प्रशिक्षक म्हणून कार्य केले. किसनराव आरकल यांच्या नंतर हलगी वाजवण्यात त्यांचे नाव घेतल्या जाते.विनोबा भावे यांच्या सहवासात एक महिना पवणार येथे राहिलेले आहेत तर बिहार मध्ये काम करीत असतांना जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर, आदी मान्यवरांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यांना विनोबांच्या भूदान चळवळीत, डॉ. बाबा आढाव यांच्या एक गाव एक पाणवठा, व सेवादलाच्या कलापथकात योगदान देता आले. त्यांचापहाडी आवाज व चळवळीतील गीत, भजन, गवळण म्हणण्याची त्यांनी स्वत:ची लकब निर्माण केली आहे.एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, यदुनाथ थत्ते, ग. प्र. प्रधान, शाहीर लीलाधर हेगडे, कवी वसंत बापट, माजी मंत्री सदानंद वर्दे, भाई वैद्य, आदींच्या सहवासात कार्यकर्ता म्हणून त्यांना कार्य करता आले आले. ते सार्वजनिक बांधकाम खात्यात आरेखक या पदावरून निवृत्त झाले. आपल्या खात्यात त्यांनी सर्वधर्माचेसार असलेली साने गुरुजींची प्रार्थना करा तो एकची धर्म म्हणण्याची परंपरा सुरु केली होती.  शाहीर म्हणून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे कार्य गेली 50 वर्ष करीत आहेत. गुणवंत कर्मचारी म्हणून त्यांचा सरकारने सन्मान केला आहे. तसेच अनेक संस्था संघटनांनी त्यांचा पुरस्कार देवून गौरव केला आहे.

No comments:

Post a Comment