कामगार चळवळीचा आधारवड हरपला ः रावसाहेब निमसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

कामगार चळवळीचा आधारवड हरपला ः रावसाहेब निमसे

 कामगार चळवळीचा आधारवड हरपला ः रावसाहेब निमसे

सरकारी कर्मचारी व शिक्षक संघटनेच्यावतीने कै. र.ग. कर्णिक यांना श्रध्दांजली


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने नगर- औरंगाबाद महामार्गावरील पाटबंधारे विभाग येथील संघटनेच्या कार्यालयात सरकारी कर्मचारी व शिक्षक चळवळीचे नेते कै. र.ग. कर्णिक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. नुकतेच मुंबई येथे कर्णिक यांचे निधन झाल्यामुळे सरकारी-निमसरकारी व शिक्षकांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी कै. र.ग. कर्णिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे म्हणाले की, कर्मचार्यांच्या हितासाठी संघटनेच्या कामाला प्राधान्य देऊन प्रत्येकाने कार्य केल्यास कै. कर्णिक यांना खरी श्रध्दांजली ठरणार आहे. कै. कर्णिक यांनी कामगार चळवळीत दिलेले योगदान न विसरता येणारे असून, त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचा आधारवड हरपला गेला असल्याचे सांगून त्यांनी कै. कर्णिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी अविरत संघटनात्मक कार्य करुन संघटना कशी बांधली जाईल व संघटनेच्या जोरावर कामगारांना कसा न्याय मिळेल हा दृष्टीकोन ठेऊन कै. कर्णिक यांचे कार्य दिशादर्शक आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षकांची अनेक प्रश्न त्यांनी शासनस्तरावर सोडवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. त्यांच्या निधनान कर्मचार्यांच्या चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असून, या दु:खातून सावरुन त्यांनी दाखवलेल्या संघटनात्मक मार्गावर चालण्याची गरज असल्याचे सांगितले. तर कै. कर्णिक यांच्या सहवासातील गेल्या तीस वर्षापासूनच्या आठवणी सांगून, आपले स्वास्थ्य, स्वाभिमान, अस्तित्व व आरोग्य आजअखेर संघटनेमुळे कसे अबाधित राहिले असल्याचे त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात कै. कर्णिक यांचे कामगार चळवळीतील योगदान स्पष्ट करुन, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी विलास पेद्राम, पी.डी. कोळपकर, जालिंदर बोरुडे, भाऊसाहेब शिंदे, एम.एल. भारदे, देविदास पाडेकर, भाऊसाहेब डमाळे, श्रीकांत शिर्शिकर, विजय काकडे, सयाजीराव वाव्हळ, पुरुषोत्तम आडेप, सुधाकर साखरे, गंगाधर त्र्यंबके आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment