नगरमध्ये 11 रोजी दुसरी एकता धम्म परिषद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

नगरमध्ये 11 रोजी दुसरी एकता धम्म परिषद

 नगरमध्ये 11 रोजी दुसरी एकता धम्म परिषद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः भारतीय बौद्ध सभा जिल्हा शाखेच्यावतीने भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिराताई यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शखाली दुसर्या धम्म परिषदेचे नगरमध्ये गुरुवार दि.11 फेब्रुवारी 2021 रोजी पंचशील विद्या मंदिर, सिद्धार्थनगर, नगर येथे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
याप्रसंगी राष्ट्रीयमहासचिव जगदीश गवई, सचिव वसंत पराड, भिकाजी कांबळे, अशोक केदारे, भदंत बी सारीपूत व श्रामणेर संघ तसेच विभागीय सचिव अनिकराव गांगुर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष के.आर.पडवळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, भगवंतराव गायकवाड व सर्व जिल्हा, तालुका  कार्यकारिणी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत बौद्ध धर्मातील विविध विषयांवर प्रबोधन, धम्मदेशना, धम्म पुरस्कार, श्रामणेर शिबीर समारोप,  स्मरणिका प्रकाशन सोहळा आदि कार्यक्रम होतील. यासर्व कार्यक्रमासाठी उपासक, उपसिकांना भोजनाची व्यवस्था केली आहे. तरी सर्व बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment