हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

 हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला अटक 


अहमदनगर  –  
शिर्डी येथील सागर शेजवळ खुन खटल्यामधील व कोरोना रजेवर असताना हत्येचा प्रयत्न करुन फरार झालेला मुख्य आरोपी विशाल कोते यांस धुळे येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे .
 याबाबत मिळालेली माहिती अशी कि  शिर्डी येथील गाजलेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील मुख्य आरोपी विशाल अशोक कोते, रा. शिर्डी हा जेलमधून कोरोना रजेवर सुटलेला असताना त्याचे विरुध्द दि. ३०/१२/२०२० रोजी फिर्यादी श्री. राजेन्द्र लालजीभाई भंडेरी, वय- ३९ वर्षे, धंदा- व्यापार, रा. साईश्रध्दा हौसिंग सोसायटी, शिर्डी यांनी तक्रार दिली की, मागील भांडणाचे कारणावरुन आरोपी विशाल अशोक कोते, रा. शिर्डी व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे नगर-मनमाड रस्त्यावर थांबलेले असताना त्यांना बळजबरीने रिक्षामध्ये बसवून पिंपळवाडी रोडने रेल्वे पटरीकडे नेवून तेथे आरोपी विशाल कोते याने त्याचे साथीदारासह फिर्यादी यांना मारहाण करुन विशाल कोते याने त्याचेकडील धारदार कोयत्याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी कडील रोख रक्कम २७,०००/-रु. व मोबाईल बळजबरीने काढून घेतला.
 सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी शिर्डी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 ८०१/२०२०, भादवि कलम ३०७, ३६७, ३९४, ४५२, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल कोते हा फरार झाला होता. सदर आरोपीची मागील गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्याचा शोध घेणेकामी मा. पोलीस अधीक्षक साो, अहमदनगर यांचे सुचनाप्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्वतंत्र पथक नेमले होते.


No comments:

Post a Comment