‘समाधान’ चा प्रवास कष्टकर्‍यांच्या मुलांना प्रेरणादायी ठरेल- शाम नळकांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

‘समाधान’ चा प्रवास कष्टकर्‍यांच्या मुलांना प्रेरणादायी ठरेल- शाम नळकांडे

 हमालाचा मुलगा जिद्द व परिश्रमाच्या जोरावर बनला सीए.

‘समाधान’ चा प्रवास कष्टकर्‍यांच्या मुलांना प्रेरणादायी ठरेल- शाम नळकांडे

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रतिकूल परिस्थितीत जिद्द बाळगून कठोर परिश्रम घेऊन एका हमालाचा मुलगा सी.ए. झाला. समाधान गीते यांचा शैक्षणिक प्रवास नगरकरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.अनेक अडचणींना सामोरे जात समाधानने केलेला सी.ए.चा प्रवास आणि कष्टकर्‍यांच्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे मत नगरसेवक श्याम (आप्पा) नळकांडे यांनी व्यक्त केले.
      समाधान ने केटरिग ची कामे तसेच मेडिकल व इलेक्ट्रॉनिक च्या दुकानात कामे करून आपले शिक्षण पूर्ण केले. दि.1 ला ऑनलाईन लागलेल्या सीए च्या निकालामध्ये समाधान सीए ची परीक्षा उत्तीर्ण झाला . त्याला फायनल च्या परीक्षेत पहिल्या ग्रुप मधे 233 तर दुसर्‍या ग्रुप मधे 226 असे गुण मिळाले. यावेळी त्याच्या कष्टाला फळ मिळाले अशी भावना त्याचा भाऊ किरण शिवाजी गिते व बहीण अश्विनी गणेश राख यांनी व्यक्त केली. सीए झाल्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक माननीय श्याम (आप्पा) नळकांडे तसेच रामभाऊ नळकांडे यांनी सहकुटुंब समाधान गिते  यांचा आई वडिलांचा सत्कार करून समाधान ला प्रोत्साहन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी  आई वडिलांच्या केलेल्या कष्टामुळेच समाधान ला हे यश मिळू शकले अशी भावना दै.नगरी दवंडीचे संपादक राम भाऊ नळकांडे यांनी व्यक्त केली.
        आजोबा - उत्तम धोंडीबा गिते हे पण हमाली च करायचे त्यानंतर त्यांची मुले  शिवाजी उत्तम गिते,  कै. परमेश्वर उत्तम गिते, राजेंद्र उत्तम गिते हेही हमाली काम करू लागले.समाधान हा शिवाजी गिते यांचा मुलगा.वडिलांची खूप तळमळ होती की समाधान याने ह्या कामात येऊ नये. ते त्याला नेहमी सांगत की सावली तले काम बघ. आज ह्या कष्टकरी दाम्पत्याच्या मुलाने आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव करून मोठ्या परिश्रमाने सीए सारखी कठीण परीक्षा पास केली. आई वडिलांचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसल्याने त्यांना तसेच  सीए बद्दल  कसलीही माहिती नसल्याने त्यांनी सुरवातीला समाधान ला सीए करण्यास नकार दिला. परंतु सीए संदीप देसरडा यांनी फोन करून समाधान च्या आई वडिलांना सीए  चे महत्व आणि समाधान हे करू शकतो असे समजावून सांगितले आणि  त्यांनाही ते पटले.
आईवडिलांनी दिलेली साथ सीए संदीप देसरडा, पठाण मॅडम यांसारखे मिळालेले गुरु तसेच मित्रांकडून मिळालेले सहकार्य यामुळेच आपण सीए होऊ शकले असे मत समाधान गिते याने व्यक्त केले. तसेच नळकांडे कुटुंबीयांनी दिलेल्या कौतुकाच्या थापे साठी त्याने नळकांडे कुटुंबीयांचे मनापासून आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here