जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्यसेवा, पूर्ववत सुरू करा ः आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्यसेवा, पूर्ववत सुरू करा ः आ. संग्राम जगताप

 जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्यसेवा, पूर्ववत सुरू करा ः आ. संग्राम जगताप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्य सेवा करोना काळात बंद करण्यात येवून कोवीड सेंटर करण्यात आले होते आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे . आर्थिक परिस्थिती हलाखीची असणार्‍यां रुग्णांना जिल्हा रुग्णालय म्हणजे मोठा आधार आहे. तरी आता जिल्हा रुग्णालयातील सर्व आरोग्यसेवा पुन्हा पूर्वरत करण्यात यावी अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ सुनील पोखरणा यांचेकडे केली आहे.
    गेल्या 1 वर्षापासून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा जिल्हा शासकीय रुग्णालय हे मुख्य कोविड सेंटर असल्यामुले दिल्या जात नव्हत्या. पण अनेक रुग्णांच्या आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणे शक्य नसल्याने ते अडचणीत आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत ज्या शासकीय योजनेनुसार वैद्यकीय व इतर सुविधा सर्वसामान्य रुग्ण व नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या जातात. त्या सर्वसोयीसुविधा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात, जेणेकरून गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना सोयी सुविधेचा लाभ घेता येईल व रुग्णांना दिलासा मिळेल, असेही याप्रसंगी आ.जगताप म्हणाले यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी पोखरणा यांनी लवकरच सर्व आरोग्य सुविधा सुरू करुन सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार दिले जातील, अशी ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here