शरद पवारांवर टीका करणार्‍यांची वैचारिक पातळी घसरली! ः आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 16, 2021

शरद पवारांवर टीका करणार्‍यांची वैचारिक पातळी घसरली! ः आ. लंके

 शरद पवारांवर टीका करणार्‍यांची वैचारिक पातळी घसरली! ः आ. लंके


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः देशाचे नेतृत्व करत असताना त्यांच्याइतका राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यास शरद पवार त्यांच्याइतका कोणाचाही नाही. जे त्यांच्यावर टीका करतात त्यांची वैचारिक पातळी घसरली आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर पूजनीय अहिल्याबाई होळकरांचा सखोल अभ्यास पवारसाहेबांइतका टीकाकारांचा नाही. त्यामुळेराज्यातील सर्व टीकाकारांनी देशाचे नेतृत्व करणार्‍या व्यक्तीमत्त्वावर हेतू पुरस्कृत आरोप थांबवावेत, असं पृत्युउत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
   जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांच्या एका वक्तव्यावरुन टीका होऊ लागलीय. याच टीकाकारांना आमदार लंके यांनी सुनावलंय. राजकीय कारकीर्द पन्नास वर्षे पूर्ण करणार्‍या शरद पवारसाहेबांवर हेतू पुरस्कृत दिशाहीन झालेले लोक टीका करतातय. जेजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात पवारसाहेबांनी जे वक्तव्य केलं, त्याचा चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात असल्याचं लंके यांनी म्हटलंय.
   जे नेते शरद पवारसाहेबांवर आक्षेप घेऊन टीका करतायत, त्यांची वैचारिक पात्रता काय?, असा सवाल करत ज्या नेत्याने संसदीय राजकारणात 50 वर्षापेक्षा जास्त काळ घालवला आहे त्या नेत्यावर टीका करताना आपण काय बोललं पाहिजे, त्याचं भान भाजप नेत्यांना राहिलेलं नाही, असं ही लंके म्हणाले. जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनावरुन बराच वाद पाहायला मिळाला. शरद पवार यांच्यासारख्या जातीयवादी नेत्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होऊ नये, अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली.तसंच आदल्याच दिवशी त्यांनी पुतळ्याचं अनावरण उरकलं. यानंतर यावरुन बरंच राजकारण रंगलं. असं असलं तरी शरद पवार यांच्या हस्ते मात्र नियोजित अनावरणाचा कार्यक्रम पार पाडला. त्यांचं अनावरण प्रसंगीचं भाषणही चर्चेत राहिलं.
   अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवारांचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं नाव घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment