पराभवाची परतफेड ः भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

पराभवाची परतफेड ः भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय.

 पराभवाची परतफेड ः भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय.


चेन्नई -  
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेच्या दुसर्‍या कसोटी मध्ये भारतीय संघाने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केला आहे. चेन्नई येथे हा कसोटी सामना सुरू होता या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सामना सुरू होण्याचे अवघ्या काही मिनिटातच भारताचे तीन महत्त्वपूर्ण विकेट इंग्लंडने घेतले होते. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि भारताच्या उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी एक महत्त्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

    भारतातर्फे पहिल्या डावात रोहित शर्माने 161 धावांची खेळी केली तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेनी 67 धावांची खेळी केली होती. पहिल्या डावात भारताने 329 धावसंख्या उभारली होती. भारताचे 329 धावसंख्याला उत्तर देत इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात फक्त 134 धावसंख्या करू शकले. भारतातर्फे रविचंद्र अश्विन यांनी पाच तर आपला पहिला कसोटी सामना खेळणारा अक्षर पटेलने दोन आणि इशांत शर्माला दोन तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here