छत्रपतींनी सदैव रयतेच्या हिताचा विचार केला : कर्डिले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

छत्रपतींनी सदैव रयतेच्या हिताचा विचार केला : कर्डिले

 छत्रपतींनी सदैव रयतेच्या हिताचा विचार केला : कर्डिले

नगर बाजार समितीच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः छत्रपतींनी सदैव रयतेचा व शेतकर्‍यांचा हिताचा विचार केला. त्यांचा इतिहास प्रेरणादायी व वैभवशाली आहे. शिवरायांनी शेतीविषय धोरण अवलंबून त्या अंमलता आणल्या. त्यामुळे शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडल्यानंतर शेतकर्‍यांनी कधीच आत्महत्या केल्या नाहीत. शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेऊन ताबडतोब सोडविण्याचे काम केले. याचबरोबर सर्व समाजाला एकत्रित करून रयतेचे राज्य निर्माण करून कारभार केला. त्यांचा इतिहास आजच्या समाजाला प्रेरणादायी आहे. याचबरोबर युवकांसमोर एक आदर्श आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व मार्केटयार्ड टेम्मो असोसिएशन वतीने मार्केटयार्डमधील छत्रपतींच्या अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, समवेत सचिव अभय भिसे, उपसचिव बाळासाहेब लबडे, जयसिंग भोर, सचिन सातपुते, मनोज कोतकर, टेम्पो चालक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
   यावेळी बाजार समितीच्यावतीने छत्रपतींच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाईसजावट करून पारंपरिक पद्धतीने आकर्षक रांगोळी काढून नागरिकांचे लक्ष वेधले होते.

No comments:

Post a Comment