शिवाजी महाराजांचे शौर्य कायम स्मरणात राहील ः डॉ. मिस्किन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

शिवाजी महाराजांचे शौर्य कायम स्मरणात राहील ः डॉ. मिस्किन

 शिवाजी महाराजांचे शौर्य कायम स्मरणात राहील ः डॉ. मिस्किन

डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमा भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे आद्य समर्थक होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या विचाराशी सहमत असणार्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून लढले. या सर्व मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी बलिदान दिले. या मावळ्यांचे जीवन कार्य सर्वांना समजावे यासाठी दरवर्षी शिवजयंतीनिमित्त या मावळ्यांच्या प्रतिमेचे वितरण करुन स्वराज्याचा इतिहास जागृत ठेवण्याचे काम यानिमित्ताने करत आहोत. यावर्षी नरविर तानाजी मालुसरे यांची प्रतिमा देऊन त्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथेचे स्मरण यानिमित्त केले आहे, असे प्रतिपादन  डॉ.संभाजी मिस्किन यांनी केले.
   छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने नरवीर तानाजी मालूसरे यांच्या प्रतिमा भेट देण्यात आले. याप्रसंगी केमिस्ट असोसिएशनचे सुधीर लांडगे, बाबासाहेब गिरवले, विष्णूपंत म्हस्के, दिपक पवार, हर्षल म्हस्के, अरुण कोरडे, रवी जपे, पंकज वावीकर, सखाराम घोडके, रमेश बनकर गोरख खंदारे आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी सुधीर लांडगे म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अलौकिक गुणांमुळे व बुद्धिमत्तेमुळे आतापर्यंतच्या सर्व पिढ्यांचे आदर्श ठरलेले आहेत. त्यांचे जीवनकार्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे. डॉ.संभाजी मिस्कीन यांच्यावतीने  स्वराज्याचे रक्षक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पराक्रमी मावळ्यांच्या प्रतिमा भेट देऊन इतिहासास उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी मावळे यांचा इतिहास पुढील पिढीच्याही कायम स्मरणात राहतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते नरविर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment