शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ः बारसे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ः बारसे

 शिवाजी राजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ः बारसे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळीवाडा बस स्थानक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे,संघटक फिरोज पठाण,मनोज कर्डिले, भाऊ साळवे,अमर निरभवणे, ड.योगेश गुंजाळ, ड.महाजन, मारुती पाटोळे,संतोष आल्हाट,संदीप वाघमारे,विनोद गायकवाड (खंडाळा),संदीप ठोंबे, पृथ्वीराज काळे,सागर ढगे आदी सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
   याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. इतिहासात आपण पाहिलंच असेल की सर्व साधारणपणे बरेच राजे महाराजे हे वंश परंपरागत पद्धतीने किंवा कटकारस्थान करून राज गादीवर विराजमान झाले आहेत.आता त्यांचा हेतू हा खरंच लोककल्याणाचा होता की फक्त अधिसत्ता गाजवण्याचा होता हा एक चिंतनाचा विषय आहे. कारण असे किती राजे आले आणि गेले पण माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच आहेत असं मला वाटतं.त्या पैकीच एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! कारण त्यांनी लोकांच्या हृदयात त्यांचं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे जे त्यांच्या अद्वितीय कर्तबगारीचं प्रतिक आहे. तसेच जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये अशी त्यांची भूमिका होती. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, तसेच त्याची व्याप्ती वाढली पाहिजे त्यासाठी परमुलुखात तो विकण्याची त्यांनी सोयसुद्धा केली.

No comments:

Post a Comment