एकदंत कॉलनीत गणेश जयंतीनिमित्त सामुदायिक विवाह व धार्मिक कार्यक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 2, 2021

एकदंत कॉलनीत गणेश जयंतीनिमित्त सामुदायिक विवाह व धार्मिक कार्यक्रम

 एकदंत कॉलनीत गणेश जयंतीनिमित्त सामुदायिक विवाह व धार्मिक कार्यक्रम


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराबरोबरच सामुदायिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंडळाचे हे 17 वे वर्षे असून दर वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच विविध कार्यक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढते. तसेच या गणेश जयंती निमित्त मंडळाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येतो. यामध्ये दरवर्षी 3-4 जोडप्यांचा विवाह लावण्यात येतात. या जयंती उत्सवास लोक दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. कोरोना या महामारीमुळे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत उत्सव मुर्ती मिरवणुक, डान्स स्पर्धा कार्यक्रम रद्द करुन यावर्षी आरोग्य शिबीरे आयोजित केली आहे. एकदंत गणेश मंदिर, मंडळाचे सर्व सदस्य व एकदंत परिवार व एकदंत महिला मंडळ यासाठी विशेष परिश्रम घेतात.
   एकदंत गणेश जन्मोत्सव 15 फेब्रुवारी 2021  रोजी आहे. शुक्रवार दि. 12 फेबु्रवारी 2021 रोजी दिप प्रज्वलनाने गणेश जयंती उत्सवास स.9 वा. प्रारंभ होईल., रात्री 8  ते 11 पर्यंत हनुमान चालिसा (श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, नवीपेठ), शनिवार दि.13 फेबु्रवारी 2021 रोजी स.10 ते दु.4 या वेळेत मोफत आरोग्य तपासणी करुन मोफत औषधे वाटप तसेच दंतरोग तपासणी, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रविवार दि.14 फेबु्रवारी 2021 रोजी सकाळी 9 ते दु. 5 पर्यंत रक्तदान शिबीर, रात्री 7 ते 9 यावेळेत एकदंत महिला मंडळ व परिवाराच्या वतीने हळदी कुंकू समारंभ, तसेच रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (बत्कम्मा) होईल.
   श्री गणेश जयंतीदिनी शुक्रवार दि.15 फेब्रुवारी 2021 रोजी स.7 ते 9 श्री विघ्नेश्वर पूजन व श्री गणपती अथर्व शिर्षन नाममुर्ती अभिषेक, स.9 ते 10.30 होम हवन, स.9 ते दु.12, श्री सत्यनाराण महापूजा,  दु.1.30 ते 3 महाप्रसाद (भंडारा), दु.4 ते  सायं.7 यावेळेत लहान बालकांसाठी गंमत जंमत व बाल मेळावा, असे कार्यक्रम होतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here