महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : अजित कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : अजित कोतकर

 केडगावमध्ये सभापती मनोज कोतकर यांच्यावतीने विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी

महाराजांचा इतिहास प्रेरणादायी : अजित कोतकर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली. सर्व युवकांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीतून गरजूवंतांना फळांचे वाटप केले. तसेच लहान मुलांसाठी ज्ञान साधना कोचिंग क्लासेस येथे निबंध स्पर्धेचे आयोजन करुन गुणवंतांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सण-उत्सव, वाढदिवस साजरे करीत असताना प्रत्येकाने आपल्या संस्कृतीचे जतन करावे व छत्रपतींचे विचार अंगीकारावे. महाराजांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अजित कोतकर यांनी केले.

   केडगाव येथे जनता आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त फळांचे वाटप करण्यात आले. तसेच तसेच ज्ञानसाधना कोंचिग क्लासेसचे निबंध स्पर्धेचे आयोजन कण्यात आले होते. एपीआय रणदिवे म्हणाले की, आजच्या युवकांना खर्‍या अर्थाने छत्रपतींच्या विचाराची खरी गरज आहे. सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी छत्रपतींचा इतिहास प्रबोधनाच्या माध्यमातून समाजासमोर मांडावा. जनतेमध्ये सामाजिक उपक्रम राबवून युवकांमध्ये एक आदर्श निर्माण करावा, असे ते म्हणाले.

   यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर कोतवाली पोलिस स्टेशनचे एपीआय रणदिवे नगर सेवक राहुल कांबळे अध्यक्ष अजित कोतकर, सोनू घेबुड, प्रशांत काळोखे, महेश गुंड, भुषण गुंड, गणेश सातपुते, संतोष घोडके, नितिन ठुबे, ओंकार कोतकर, भरत मतकर, गणेश साळुखे, पप्पू मतकर, सादिक शेख, बंटी विरकर, नवनाथ कोतकर, मुख्याध्यापक संदिप भोर, तुषार कोतकर, संतोष कोतकर, शाहरूख शेख, शबाना सय्यद, महेश मोहिते, अनिकेत कोतकर, गणेश कोतकर, शंभू कोतकर, निखल निकाळजे, प्राध्यापक प्रसाद जमदाळे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here