रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार : सभापती मनोज कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार : सभापती मनोज कोतकर

 अरणगाव ते केडगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु

रस्त्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देणार : सभापती मनोज कोतकर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः संपूर्ण विश्वाला शांततेचे संदेश देणारे कटर मौनसाधक अवतार मेहेरबाबा यांचे समाधी स्थळ असलेले अरणगाव येथील मेहराबाद येथे देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील भाविक येत असतात. अरणगाव येथील या मेहेराबादकडे जाण्यासाठी केडगावमधून जाणारा रस्ता भाविकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याचे खडीकरण, दुरुस्ती, नूतनीकरण व्हावे यासाठी आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र आजतागायत या रस्त्याचे कुठल्याही प्रकारे दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे या रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे महानगरपालिकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरुपात मुरूम टाकून बुजविण्याचे काम हात घेतले असल्याची माहिती महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिली.

   शहराला जोडणारे केडगाव हे महत्त्वाचे उपनगर आहे. केडगावचा विकास व्हावा, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहे. दिवसेंदिवस केडगावमध्ये विविध नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना मुलभूत सुविधांपासून विकासकामे करावी लागत आहेत. या रस्त्यावर मेहेरबाबा अरणगाव ते केडगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here