चिचोंडी पाटील येथे शिवजयंती साजरी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

चिचोंडी पाटील येथे शिवजयंती साजरी.

 चिचोंडी पाटील येथे शिवजयंती साजरी. 

नूतन ग्रामपंचायत कार्यकारिणीचा पदग्रहण कार्यक्रम संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
चिचोंडी पाटील -
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती,प्रतीमे ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत चिचोंडी पाटील येथील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा पदग्रहण कार्यक्रम पार पडला. नवनिर्वाचित सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे,सदस्य दत्तू धुळे,शरद  पवार,यशोदा कोकाटे,संदीप काळे,वैभव कोकाटे,मनिषा ठोंबरे,दीपक हजारे,अर्चना चौधरी,सविता खराडे,अशोक कोकाटे,रिता कांबळे,जयश्री कोकाटे,मंगल बेल्हेकर यांनी पदग्रहण केले.

नूतन कार्यकारिणीने गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गावातील रस्ते,लाईट,पाणी, व इतर सर्व सुविधांवर विशेष लक्ष ठेवणार आहे.अशी माहिती सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार सोहेल मनियार तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदींचा सन्मान केला.व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर,पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे,डॉ. मारुती ससे,विश्वसागर कोकाटे,राजेंद्र कोकाटे,प्रमोद पवणे,विजय गाडे, प्रशांत कांबळे यांसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment