म.सा.प सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकाचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

म.सा.प सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकाचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक

 म.सा.प सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकाचे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर, अहमदनगर शाखा व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन यांनी प्रकाशित केलेल्या वारसा दिवाळी अंकांचे साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत असुन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत प्रा डॉ रावसाहेब कसबे यांनी नुकतेच पुणे येथे अंकांच्या दर्जा व गुणवत्तेबद्दल आनंद व्यक्त करून साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया, प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, संपादक मंडळ तसेच शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचे अभिनंदन केले.
   गेल्या सहा वर्षापासून सातत्य ठेवून अंकाची निर्मिति करताना नामवंत लेखक, कवींच्या साहित्यासोबत ग्रामीण, शहरी भागातील लेखकांच्या प्रतिभेला अंकामध्ये योग्य स्थान देत साहित्य चळवळ समर्थपणे वाढविण्याचे कार्य सावेडी म सा प शाखेने  केले आहे. अशा शब्दात त्यांनी गौरव केला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा जोशी मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह श्री प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सौ सुनीताराजे पवार, कार्यकारिणी सदस्य श्री विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रा. मिलींद जोशी म्हणाले की,महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना 111 वर्षांची समृद्ध परंपरा आहे कोरोनाच्या महामारीत दिवाळी अंकाची ही परंपरा खंडित होते आहे की काय अशी भीती वाटत होती सर्व प्रकारच्या प्रतिकुलतेचा सामना करीत दिवाळी अंकांच्या संपादकांनी जीव धोक्यात घालून आणि आर्थिक तोटा सहन करून दिवाळी अंक प्रसिद्ध केले ही अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे मसाप सावेडी शाखेने काढलेला वारसा हा दिवाळी अंक आशय,विषय आणि मांडणी या सर्व अंगांनी सुंदर आणि दर्जेदार आहे मसाप सावेडी शाखेची ही कामगिरी महाराष्ट्र  साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेत भर घालणारी आहे असे सांगून जोशी यांनी या उत्तम  कामगिरीबद्दल संपादक नरेंद्र फिरोदिया ,कार्यकारी संपादक जयंत येलूलकर आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.सौ सुनीताराजे पवार म्हणाल्या की, वारसाअंकाने नगर व नगर बाहेरील अनेक साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देताना दर्जामधे कुठेही तडजोड केली नाही. उत्कृष्ठ अंक कसा करावा याचा आदर्श घ्यायचा असेल तर वारसा दिवाळी अंक त्याचे उत्तम उदाहरण आहे.
   श्री प्रकाश पायगुडे म्हणाले की, सावेडी शाखेने गेली सहा वर्षे वारसा अंकाची निर्मिति करीत शाखेच्या माध्यमातून तसेच शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या बहुमोल सहकार्याने विविध साहित्य उपक्रमातून अहमदनगरची साहित्य चळवळ वाढवली आहे.गेल्या वर्षी वारसा दिवाळी अंकास महाराष्ट्रातील मान्यवर साहित्य संस्थांकडून उत्कृष्ठ दिवाळी अंकांसाठी पाच प्रथं क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत.सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व म सा प जिल्हा प्रतिनिधी जयंत येलुलकर यांनी शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व अध्यक्ष श्री नरेंद्र फिरोदिया यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत भविष्यातही विविध साहित्यिक उपक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केले जातील असे सांगून आभार मानले.

No comments:

Post a Comment