माजी आ. वैभव पिचड भाजपच्या राष्ट्रीय मंत्रिपदी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 4, 2021

माजी आ. वैभव पिचड भाजपच्या राष्ट्रीय मंत्रिपदी

 माजी आ. वैभव पिचड भाजपच्या राष्ट्रीय मंत्रिपदी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारतीय जनता पक्षाने मधुकरराव पिचड यांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड ज्यांचे भाजपकडूनही उपेक्षाच झाली.
    भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिचड यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार समीर उराँव यांनी पिचड यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. पिचड यांना राष्ट्रीय राजकारणातील पद मिळावे म्हणून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
    ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नगर जिल्ह्यात दौरे झाले. त्यावेळी दोघांनीही पिचडांवर टीका केली. ऐनवेळी पक्ष सोडल्याचा राग पवारांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीत पिचडांचा पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमधूनही त्यांना हटवा, असे जाहीर आवाहनच पवारांनी अकोले तालुक्यातील लोकांना केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here