भुतकरवाडी चौक येथे श्रावणी ज्वेलर्सचे आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 16, 2021

भुतकरवाडी चौक येथे श्रावणी ज्वेलर्सचे आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

 भुतकरवाडी चौक येथे श्रावणी ज्वेलर्सचे आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

शहर विस्तारीकरणामुळे व्यवसायाला चालना : आ. अरुणकाका जगताप

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः विकासकामांमुळे शहरीकरणामध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे शहरविस्तारीकरणात भर पडत आहे. त्यामुळे विविध व्यावसायिकांना चालना मिळत आहे. पूर्वी सराफ बाजाराचा व्यवसाय हा फक्त गंजबाजार पुर्तेच मर्यादित होता. परंतु आता विस्तारामुळे तो संपूर्ण शहरात सराफाची दालने वाढत आहेत. श्रावणी ज्वेलर्सने आपल्या प्रामाणिकपणा व विश्वासाच्या जोरावर ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असे प्रतिपादन आ. अरुणकाका जगताप यांनी केले. बालिकाश्रम रोड (भूतकरवाडी चौक) येथे श्रावणी ज्वेलर्सचे उद्घाटन आ. अरुणकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. संग्राम जगताप, उद्योजक सुभाष कायगावकर, राजेंद्र हिंगणगावकर, अँड. उद्योजक शिवजित डोके, बंटी देवळालीकर, अतुल महाले, प्रकाश डहाळे, वैजनाथ चिंतामणी, सचिन जाधव, सुमित भालेराव, सुजित सानप, संचालक प्रभाकर कुलथे, राहुल कुलथे, विशाल कुलथे, सविता कुलथे, शिल्पा कुलथे, नयन कुलथे आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना आ. संग्राम जगताप म्हणाले की, बालिकाश्रम (महात्मा फुले) रोडचे काम मी महापौर असताना मंजूर करून आणले आणि पूर्णही केले. आज शहरातील काँक्रिटीकरणाचा हा पहिला रस्ता निर्माण केला. त्यामुळे या भागाच्या वैभवात भर पडली. त्यामुळे नवीन व्यवसायिकांना चालना मिळाली. श्रावणी ज्वेलर्सने आपल्या सराफी व्यवसायामध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मेहनतीच्या व प्रामाणिकपणाच्या जोरावर व्यवसायत भरारी घेतली आहे, असे ते म्हणाले. यावेळी संचालक राहुल कुलथे म्हणाले की, श्रावणी ज्वेलर्सच्या माध्यमातून सावेडी उपनगरातील ग्राहकांना चांगली सेवा देऊ. तसेच सोन्यातील विश्वासार्हता जपण्याचे काम आम्ही करत आहोत. त्यामुळे ग्राहकांना आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी प्रभाकर कुलथे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here